अजिंठा लेणी / Ajanta Caves

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात सोयगाव तालुक्यात वाघूर नदीच्या परिसरात डोंगर कपारीत खोद‌काम करून लेणी निर्माण केली आहेत. ही लेणी अजिंठा लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत.इ.स. पूर्व 500 ते इ स 800 पर्यंतचा काळ हा गौतम बुद्ध यांच्या विचारांचा काळ मानला जातो. सम्राट अशोक यांनी बुद्ध धर्म स्वीकारून बुद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. सम्राट अशोकाने संपूर्ण भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, चीन इत्यादी देश बुद्‌धमय करून टाकले होते.

इ.स.पू. 200 ते इ.स. 400 या काळात गौतम बुद्‌धांच्या अनुयायांनी भारतात आणि अफगाणिस्तानात अनेक ठिकाणी लेण्यांच्या रुपात बुद्ध चरित्र आणि विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांतीलच एक महत्त्वाची लेणी म्हणजे अजिंठा लेणी होय.या लेण्यांना बौद्‌ध लेणी असे म्हणतात. त्याविषयी आपण आता माहिती घेऊ—–

अजिंठा लेणी पाहायला कसे जाल ?

* जळगावहून अजिंठा लेणी 56 किमी अंतरावर आहे. येथून एक तासात अजिंठा येथे जाता येते.

* बुलढाण्याहून अजिंठा लेणी 59 किमी अंतरावर आहे.

* शिर्डीहून अजिंठा लेणी 194 किमी आहे.
* छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हून अजिंठा लेणी 102 किमीअंतरावर आहेत.

* भुसावळहून अजिंठा लेणी 62 किमी अंतरावर आहेत.

* धुळ्याहून अजिंठा लेणी 131 किमी अंतरावर आहेत.

अजिंठा लेणी पाहायला जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. आपल्या सोयीनुसार कोणत्याही मार्गाने तुम्ही जाऊ शकता.

युनेस्को आणि अजिंठा लेणी(UNESCO And Ajinta Caves]:

UNESCO ने 1983 साली अजिंठा लेणी हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ [World heritage site] म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे अजिंठा लेण्यांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी हजारो परदेशी पर्यटक, संशोधक, अभ्यासक अजिंठ्याला भेट द्यायला येतात. आणि लेण्यांचा इतिहास आणून घेतात.

महाराष्ट्र शासनाने अजिंठा लेण्यांचे महत्त्व ओळखून 2013 साली 7 आश्वर्ये आहीर केली. त्यांत अजिंठा लेण्यांचा समावेश आहे. भारत सरकारच्या 20 रुपयांच्या चलनी नोटेवर अजिंठा येथील एका लेण्याचे चित्र आहे. या लेण्यांचा उपयोग बौद्ध भिक्षुक राहण्यासाठी, काही काळ विसाव्यासाठी, चिंतन, पठण आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी करत असत.

भारतातील बौद्ध धर्माच्या अधःपतनानंतर या लेण्यांकडे दुर्लक्ष झाले. ब्रिटिशांच्या काळात या लेण्यांना पर्यटनाचे स्थान देण्यात आले. भारतीय पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञांच्या मतानुसार लेण्यांतील भिंतींना जे प्लॅस्टर केले आहे ते गाई-बैलांचे शेण, तांदळाचा भुसा, माती, चुना, लिंबाचा रस या सर्वांचे मिश्रण केलेले प्लॅस्टर आहे. हे प्लॅस्टर आजही सुस्थितीत आहे. चित्रे रंगवण्यासाठी वापरलेला रंग हा झाडांची पाने, फुले आणि काही खनिजे यांच्या मिश्रणातून तयार केलेला आहे. चित्रातील रंग आजही सुस्थितीत आहे. चित्रातील आकृत्या बहुतांश स्त्रियांच्या आहेत.त्यांची केशरचना सुबक अणि आकर्षक आहे.

अजिंठा लेखातील चित्रांचे तीन प्रकार*Three types pictures in Ajanta Caves.

1. भित्तीचित्रे [Portrature Pictures]

2. कथानक चित्रे [Narration Pictures]

3. जातक गोष्टींची चित्रे [Jataka Stories Pictures]

आता आपण लेण्यांची ओळख करून घेऊया——

अजिंठ्याची चित्रे तीन प्रकारात मोडतात –

१) भिती चित्रे (Portrature)

२) कयानक (Narration)

३) जातक गोष्टी (Jataka Stories)

लेणी क्र. 1


या लेणीत वीस खाबांवर आधारीत एक दालन आहे. खांबांवर फारच सुंदर नक्षीकाम केलेले आहे. चित्रात जातक कथा दर्शविलेल्या असून ज्या महात्मा बुद्धाच्या पूर्व जन्मावर आधारित आहेत. पूजा स्थळी बुद्धाची एक विशाल मूर्ती आहे.तिच्या चेहऱ्यावर उजव्या बाजूने प्रकाश झोत टाकल्यास चेहरा गंभीर दिसतो.डाव्या बाजूने प्रकाश झोत टाकल्यास चेहरा चिंतीत दिसतो आणि समोरील बाजूचा चेहरा तपस्या आणि शांती प्रदर्शित करतो.

बाहेरील भिंतीवर एक चित्र आहे. ती एक प्रेम देवता आहे आणि ती बुद्धास रोखून ठेवत आहे व तपस्या न करण्यास सांगत आहे असा भास होतो. दुसऱ्या एका चित्रात वृद्धाच्या अनेक मुद्रा दर्शविण्यात आल्या आहेत.

सभादालन डाव्या बाजूस आहे.येथील चित्रात शिबी जातक कथा दर्शवितात. येथे राजा शिबी एका कबुतराचे ससाण्यापासून संरक्षण करीत आहे, असे चित्र रंगवलेले आहे.

हत्तीचा राजा नागराज याची जन्मकथा व एक महिला रथात बसलेली आहे. हे दृश्यही त्याच ठिकाणी आहे .पूजास्थाना जवळच्या भिंतीवर जगप्रसिद्ध “पद्मपाणी” ची मुद्रा दर्शविलेली आहे. महात्मा बुद्धाचे हे प्रसिद्ध चित्र इटालियन समकालीन युगातील चित्राप्रमाणे जगप्रसिद्ध आहे.

पोर्टरेट आर्ट (Portrait Art) शी संबंधित येथील चित्रकारी जगातील उत्कृष्ट पोर्टरेटस पैकी एक आहे. महात्मा बुद्धाच्या एका हातातील कमळ शांती आणि पवित्रतेची निशाणी आहे. “पद्मपाणी” च्या निकट एका नारीची आकृती आहे. उजव्या बाजूस भितीवर वज्रपाणी आणि काळ्या राजकुमारीची आकृती आहे .जिच्या शरीरावर फक्त आभुषणे दिसतात बाकी नग्न आहे.

एका दरबारचे दृश्य दर्शविण्यात आले आहे .विदेशी महत्वाकांक्षी लोक भारतीय राजांना नजराना भेट करत आहेत. बुद्धाची माता मायावतीचे स्नान करतानाचे चित्र आहे. याशिवाय आखाड्यात काही जनावरे लढत आहेत असे चित्र आहे. तसेच छतावर कित्येक नक्षीत आणि फळांची चित्रे आहेत. ती उत्कृष्टपणे चितारलेली व कोरलेली आहेत. त्यांत काही रंगीत आहेत. या डिझाईनची आजकाल साडीवर आणि शालींवर नक्कल करण्यात येत आहे. आणखी काही दृश्य दाखविण्यात आलेली आहेत. त्यांत राणी “अरुण्वती” झोका घेत असतांना दुष्टीस पडते. असेच एक अद्भुत चित्र सांडचे आहे. ते कोणत्याही कोणातून पाहिले असता पाहणाऱ्यास असे वाटते की तो सांड आपल्यावर आक्रमण करुन येत आहे.

लेणी क्र.2

या लेण्याच्या डाव्या बाजूस हंसाची जन्माची कथा दर्शविण्यात आली आहे .बुद्धाची माता आपले स्वप्न राजास सांगत आहे. बुद्धाचा जन्म आणि बुद्धाचे माता पिता त्यांच्यावर प्रेम करतांना चित्रित करण्यात आले आहे.

डाव्या बाजूस एका खोलीत बुद्धाची आकृती आहे .तिथे छतावर हंसपक्षाचा थवा दर्शविण्यात आला आहे. इतर चित्रात आजच्या युगात उपयोगात येणाऱ्या कित्येक वस्तू दाखविण्यात आल्या आहेत. जसे मफलर ,पर्स आणि स्लीपर.

येथे पूजास्थानावर बुद्धाची आकृती आहे. काही सुन्दर चित्रे चित्रित करण्यात आली आहेत. पूजा स्थानाच्या समोर एक आखाडा आहे. त्यात बुद्धाच्या कित्येक आकृत्या आहेत. छतावर सुंदर नक्षीचे चित्रण केले आहे. या नक्षीकामाच्या डिझाईनची नक्कल साडी आणि मातीवर करण्यात येत आहे.सभा दालनात कित्येक खांब आहेत.

लेणी क 3
ही लेणी अपूर्ण अवस्थेत आहे.

लेणी क्र. 4:

– ही सर्वात विशाल लेणी आहे. या लेण्यात 28 खांब आहेत. दारावर द्वारपालांची जोडी दर्शविण्यात आलेली आहे. आत पूजास्थळी महात्मा बुद्धाची विशाल आकृती आहे. जी अष्ट भयापासून संरक्षण करत आहे असे दृष्टीत पडते.

लेणी क्र. 5

ही लेणी अपूर्ण असून यात काही बुद्धाच्या आकृत्या आहेत.

लेणी क्र. 6:-


ही लेणी दोन मजली आहे. सभा कक्षात बुद्धाची “पद्मासन” मुद्रेत आकृती आहे. दुसऱ्या मजल्यावरील सभा भवनात खांब आहेत. प्रवेशद्वारावर मगरीचे आणि फुलांचे अर्धगोलाकार Arch बनविलेले आहेत.

लेणी क 7 :-

या लेण्यात पूजास्थानी बुद्धाच्या सहा आकृत्या आहेत. प्रवेशद्वारावर द्वारपाल दर्शविण्यात आले आहेत.

लेणी क्र. 8:-

या लेण्यात काहीच नाही. या ठिकाणी पर्यटन विभागाने विद्युत गृह स्थापित केलेले आहे.

लेणी क्र. 9:-
हे एक पूजा स्थान आहे .येथे 22 खांब आहेत. ही लेणी सर्वात पुरातन आहे. तिला 2200 वर्ष झालेले आहेत.

लेणी क्र. 10:

या लेण्यात एक “हिनायान” मंदिर आहे. मंदिरात जवळपास 40 खांब आहेत. त्यावर उत्कृष्ट कोरीव काम केलेले आहे. यात एक स्तूप सुद्धा आहे .त्यावर पाली भाषेतील ब्राह्मी लिपीमध्ये लेख कोरलेले आहेत. त्या लेखावरून स्पष्ट होते की, या लेण्यांची निर्मिती .इ स पूर्व दुसर्‍या शतकाच्या अगोदर झालेली आहे. या लेखात असेही दर्शविण्यात आले आहे की, या लेण्याचा दर्शनी बांबू, लाकूड व्यापाऱ्याने स्वतःच्या जबाबदारीने काढला होता.पण येथे संपूर्ण लेणी नाही.

लेणी क्र. 11:-

या लेण्याचा सभा मंडप फार मोठा आहे. आतील भागात पूजास्थानी भगवान बुद्धाची आकृती आहे.

लेणी क्र. 12 ते 15 :-

या लेण्यांत विशेष असे काहीच नाही.

लेणी क्र. 16:-

या लेण्यात फारच महत्वपूर्ण चित्रे आहेत. यात बुद्धाच्या जीवनावरील घटना दर्शविण्यात आल्या आहेत. डाव्या बाजूस एका दृष्यात बुद्धाचे चुलत बंधू नंद दाखविण्यात आले आहेत. जे सांसारिक सुखाचा त्याग करून भिक्षु बनलेले आहेत. एका दृष्यात नंदाची माता दाखविण्यात आलेली असून ती मूर्च्छित पडलेली आहे .एक परिचारिका तिची देखरेख करीत आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की नर्सचा पेहराव तोच आहे जो आजकाल उपयोगात आणला जातो.
येथे कथकली नृत्याचे चित्र प्रशंसनीय आहे. आत पूजा स्थानी बुद्धाची विशाल आकृती आहे. “परलम्बापद” मुद्रा, हत्ती, पाहावयास मिळतात .ते अतिशय सुंदर आहेत. आकर्षक आहेत. छतावरील घोडे, मगरीचे चित्र सुंदर आहे.

येथे एक चित्र बुद्धाच्या मातेचे आहे. त्यात ती आपल्या पतीस स्वप्न सांगत असून ज्योतिषी त्या स्वप्नांचा अर्थ सांगत आहेत. या चित्रावर थ्रि-डी चा प्रभाव जाणवतो.

लेणी क्र. 17 :-

या लेण्यात बुद्धाच्या जीवनावरील कित्येक घटना आणि जातक कथा दर्शविण्यात आल्या आहेत. सभा भवन सुंदर आहे व पूजास्थानात बुध्दाची आकृती आहे. डाव्या बाजूस बुध्दाच्या पूर्व जन्माचे चित्र असून ते एका हत्तीचे आहे. हत्तीला अनेक सोंडी आहेत. नंतर मुंग्या झाडावर चढत आहेत असे दृष्य आहे. महाकवी कथेत बुद्धास वानराच्या जन्मी दाखविण्यात आले आहे.
शिवाय एका भावुक दृष्यात राजकुमारास दयाळू दाखविण्यत आलेले असून तो आपल्या परिवारास त्या वेळेस भेटतो ज्या वेळेस त्याने सांसारिक वस्तूंचा त्याग केलेला आहे.

बुद्ध आपल्या पत्नी राजकुमारी यशोदरा आणि पुत्र राहूल यांच्या कडे भीक्षा मागत असतांना दर्शविलेले आहे. बुद्धाने विशाल शरीर धारण केलेले असून यशोदरा आणि राहूलचे शरीर लहान दर्शविण्यात आलेले आहेत. पूजास्थानी वाका-ताका वंशातील राजा “हरिसेन” ची आकृती आहे .राजा हरिसेन आणि त्याचा मंत्री वराहदेव आपल्या हातात दीपक घेऊन बुद्धासमोर उभे आहेत. त्याचा भावार्थ असा आहे की, ते जगास बुद्धाच्या विचारांनी प्रकाशमान करतील.

याचे छत इतके सुंदर चित्रित केलेले आहे . असे भासते की हा एक कपडा असून त्याच्या सर्व बाजूस काठ किनारपट्टी आहे. छतावर परी कथा चित्रित केलेल्या आहेत दालनातसुद्धा चित्र आहेत. जे जीवनाच्या अनेकतेस दर्शवितात. शिवाय एक चित्र हत्तीचे सुद्धा आहे. ज्यास देवदत्तने बुद्धास मारण्यासाठी आणले होते; परंतु बुद्धाने या मदोन्मत्त हत्तीसही आपल्या अंकीत करून घेतले. एका अप्सरेचेही सुंदर चित्र आहे.

लेणो क. 18:-

ही एक रिकामी खोली आहे आत पाण्याचे तळे आहे.

लेणी क्र. 19:-

हे एक घोड्याच्या नालेच्या आकाराचे मंदिर आहे. बुद्धाच्या आकृत्या आहेत आणि नागराजा आपल्या पत्नी समवेत दर्शविलेला आहे. डाव्या बाजूस बुद्ध आपल्या पत्नी आणि पुत्राकडून भीक्षा घेत आहेत. असे दृष्टीस पडते तीन छत्रीचे एक स्तुप असून त्यावर बुद्धाच्या आकृत्या कोरलेल्या आहेत.

लेणी क्र. 20:-

पूजास्थानात बुद्ध प्रवचन सांगत आहेत असे दर्शविण्यात आलेले आहे.

लेणी क्र. 21:-

हे एक “चैत्य” आहे. त्यावर एक विशाल बुद्धाची मूर्ती परिनिर्वाण मुद्रेत आहे. डावीकडील भिंत दालनाच्या जवळच आहे. एका दृष्यात मारा बुद्धास आपल्या उद्देशापासून परावृत्त करत आहे. या मंदिराच्या भितीवर भव्य शिल्पकलेचे काम केलेले आहे. ज्यामूळे स्तुप सजलेले दिसते.

लेणी क्र. 22 :-

ही लेणी अपूर्ण आहे. तरीही उजव्या बाजूच्या भितीवर फारच सुंदर चित्र चित्रित केले आहे. ज्यात सात मनुष्य , बुद्ध बोधी वृक्षाखाली मेत्रियाच्या बरोबर दर्शविलेले आहे.

लेणी क्र. 23 :-

ही लेणी सुध्दा अपूर्ण आहे. परंतु खांबांवर कलाकारांच्या सुंदर कलाकृत्या आहेत.

लेणी क. 24 :-

ही लेणी अपूर्ण आहे.जर पूर्ण झाली असती तर उत्कृष्ट लेणी म्हणून ओळखली गेली असती.हे लेणे क्षेत्रफळाच्या दृष्टीने फार मोठे आहे. याची भव्यता आणि कलात्मकता सुंदर असून, प्रशंसनीय आहे.

लेणी क्र. 25:

हे एक अपूर्ण “विहार” आहे. ज्यात एकही पूजा स्थान नाही व कक्ष नाही. फक्त एक अंगण आहे.

लेणी क्र. 26 :-

या लेण्यात बुध्दाच्या जीवनावर आधारित दोन चित्र आहेत. जी डाव्या बाजूच्या भितीवर आहेत. पहिल्या चित्रात बुध्दाचे चित्र असून ते महापरीनिर्वाण मुद्रेत दर्शविण्यात आले आहे. दुसऱ्या चित्रात मारा (Assault’) दर्शविण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूस बुद्ध एका वृक्षाखाली बसलेले दिसतात. मारा आपल्या राक्षसी शक्तिसह तेथे पोहचतो. नंतर मारा आपल्या राक्षसी शक्तीस परत घेऊन जातो. माराच्या कन्या बुद्धास आपल्या मायावी हावभावाने आकृष्ट करतात व निराश मारा असे दृष्य दिसते.

लेणी क्र. 27 :-

हे लेणे लहान आहे. लेणी क्र. 26 चाच एक भाग आहे असे वाटते. दोन मजली असून भग्न झालेली आहे. दुसरा मजला ही अपूर्ण आहे

लेणी क्र. 28 व 29 :-

या दोन लेण्या उंच दगडाच्या वर आहेत. यांत पाहण्यासारखे विशेष असे काहीच नाही. लेणी क्र. 28 मध्ये एक अंगण व स्तंभ आहे. लेणी क्र 29 मध्ये फक्त खोदकाम झालेले दिसते. परंतु तेथपर्यंत जाण्यास पायऱ्या नाहीत.

2 thoughts on “अजिंठा लेणी / Ajanta Caves”

  1. अजिंठा लेण्यांविषयी खूपच छान आणि सखोल माहिती या लेखातून पहायला मिळते. अजिंठा लेण्यांना भेट देण्यापूर्वी किंवा भेट देत असताना हा लेख वाचल्यास निश्चितच हा लेख प्रत्येक लेण्याची ईतंभूत माहिती सांगेल. खूपच छान ऐतिहासिक माहिती सांगण्याचा प्रयत्न.

    Reply

Leave a comment