हेमंत करकरे – खरा देशभक्त / Hemant karkare

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून हाहाकार उडवून दिला होता. ती घटना आजही महाराष्ट्रीयन विसरलेले नाहीत. तत्कालीन एटीएस प्रमुख (दहशतवाद विरोधी पथक प्रमुख) Hemant karkare यांच्याकडे सर्व सूत्रे होती. हेमंत करकरे स्वतः मैदानात उतरून लढले होते. यांतच त्यांचे बलिदान गेले होते.

पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्‌यांनी मुंबई समुद्रकिनारपट्‌टीवर आल्यावर तेथील नौका ताब्यात घेतली, नावाड्याने गेट वे ऑफ इंडिया’ जवळ आणून सोडल्यावर त्याला गोळी मारून मारले आणि दहशतवादी ताज हॉटेलात शिरले. काही दहशतवादी ‘हॉटेल ओबेरॉय’ च्या दिशेने गेले आणि अंधाधुंद गोळीबार सुरु झाला; पण त्याच वेळी मुंबईत अनेक ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट चालू होता. करकरे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामा हॉस्पिटल कडे जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. आदेशाचे तंतोतंत पालन करत करकरे, विजय साळसकर, कामटे इत्यादी मंडळी कामा हॉस्पिटलकडे निघाली. कामा हॉस्पिटलच्या परिसरातच चकमक झाली. प्रतिकार करण्याची संधी न मिळताच सर्व काही शांत झाले होते. जणू काही हेमंत करकरे कामा हॉस्पिटलकडे येणार आहेत, हे दहशतवाद्यांना अगोदरच समजले होते. कोण होते ते दहशतवादी? अकरा दहशतवादी किती ठिकाणी बॉम्बस्फोट आणि गोळीबार करू शकतात ? करकरे यांनी घातलेल्या बुलेटप्रूफ जॅकिटातून गोळ्या आरपार कशा गेल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरे निरुत्तरच राहिली होती. मात्र भारताने एका सच्चा देशभक्ताला गमावले होते.

हेमंत करकरे हे एक निष्ठावंत पोलीस अधिकारी होते, तितकेच ते सच्चे देशभक्त होते .खासगी इंटरनॅशनल कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून UPS मार्फत स्पर्धा परीक्षा देऊन आय. पी. एस. अधिकारी बनले, ते देशासाठी काहीतरी करण्यासाठीच. कंपनीत झोकून देऊन काम केले तर आणखी पगार वाढेल, पण देशासाठी झोकून देऊन काम केले तर चांगली देशसेवा घडेल ,या हेतूनेच ते सरकारी नोकरीत रुजू झाले.

आय.पी. एस. चे ट्रेनिंग संपल्यानंतर करकरे ह्यांना बेस्ट कॅडेट हा पुरस्कार मिळाला. पुढे सरकारी सेवेत दाखल झाल्यावर निपक्षपातीपणाने कार्य करत अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. एकही रुपयाची लाच न होता पोलीस अधिकारी म्हणून काम करणारे दुर्मिळच आहेत. अशा दुर्मिळ अधिकाऱ्यांपैकी एक हेमंत करकरे होते. ए. टी.एस. अधिकारी म्हणून त्यांची उशिराच नियुक्ती झाली होती, तरी त्यांनी कधी कुणाकडे कूरकूर केली नाही की पदोन्नतीची भीक मागितली नाही. जेथे बदली होईल तेथे उत्तम प्रकारे आणि निपक्षपातीपणे काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. ए. टी. एस अधिकारी म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचा चार्ज आल्यावर तेथील नक्षलवाद्यांची पाळेमुळे मुळासकट उपटून काढण्याचे काम त्यांनी केले होते. जे त्यांच्यापूर्वी कुणालाही शक्य झाले नव्हते. चंद्रपूर, गडचिरोली जंगलातून फिरत सर्व आघाड्यावर ते खतः नेतृत्व करत. आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत.

” करकरे यांच्याकडे मुंबईचा चार्ज आल्यावर मुबंईतील गुंडगिरी मोडित काढली होती, हे करत असताना कुणाच्याही दबावाला बळी न पडता काम करण्याची त्यांची पद्धत लोकांना खूप आवडे.

मालेगाव बॉम्बस्फोट आणि दंगलीची चौकशी त्यांनीच केली. खरे गुन्हेगार कोण आहेत, हे त्यांनी शोधून काढले होते. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेचा त्यांच्यावर खूप राग होता. तत्कालीन संरक्षण मंत्री राजनाथसिंह, अडवाणी यांनी करकरे यांच्या कार्यपद्‌धतीवर टीका केली होती. वर्तमानपत्रात उलटसुलट बातम्या येत; पण ते कधीच डगमगले नाहीत.देशसेवेत कमी पडले नाहीत.

२६/११ च्या मुंबई हल्ल्याची पूर्वकल्पना अमेरिकेतील गुप्तचर संघटनेने भारताच्या I.B. ला दिली होती. एवढेच नव्हे तर येणाऱ्या दहशतवाद्‌यांचे फोन टॅप करून भारताच्या Ⅰ. B. कळवले होते. एवढे मोठे संकट चालून येत असताना I.B. ने कानाला खडा का लावला हे निरुत्तरच राहिले. होना?

हेमंत करकरे यांना कामा हॉस्पिटलच्या दिशेने पाठवण्याचा जाणीवपूर्वक प्लॅन तर नव्हता ? हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी बुलेटप्रूफ जॅकिटाची मागणी केली होती, पण ते जॅकेट हरवल्याचे भारताच्या गृहमंत्रालयाकडून सांगितले होते.

ते काहीही असो, पण एका प्रामाणिक आणि सच्चा देशभक्ताला भारताने गमावले होते. त्यांच्या सेवा काळात उत्तम सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले होते. बलिदानानंतर अशोक चक्र दिले’ होते. हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. पण त्यांच्या मृत्युमुळे असलेले नुकसान या पुरस्कारामुळे भरून निघणारे नव्हते. हेमंत करकरे यांना मानाचा मुजरा. यांच्या पावलावर पावले ठेवून असेच प्रामाणिक आणि निष्पक्ष अधिकारी देशाला मिळोत हीच अपेक्षा.

हुताम्यांना फाशी

या देशात हुतात्मा बनण्याचा गुन्हा तुम्ही कधी करू नका

हुतात्म्यांना अशोकचक्र का मिळालं?’ असा मृत्यूनंतर वितंडवाद घातला जाईल.

‘राम प्रधान’ हुतात्म्यांनासुद्धा फाशी देऊन टाकतील.

म्हणून या देशात हुतात्मा बनण्याची चूक कधी करू नका. ‘२६/११ ला मदत वेळच्या वेळी का मिळाली नाही’

किंवा चाळीस मिनटं बॉडीज रस्त्यावर का पडून होत्या. या देशात हुतात्म्याची पत्नी बनून प्रश्न असे विचारू नका.

आधी या देशात हुतात्मा बनण्याचा गुन्हा तुम्ही कधी करू नका कुठल्याही देशात हुतात्म्याची अल्कोहोल चाचणी होत नाही पण आपल्या देशात ही चाचणी होते.

याच्यामागची राजनीती जाणून कधी घेऊ नका ‘कुणी अधिकाऱ्यानं वॉकीटॉकी का बंद केला?

कुणी अधिकारी टेरेसवर का बसून होता?

धाडसानं उभं राहून बोट कधी दाखवू नका. हुतात्म्यांना मिळणारं कॉम्पेनसेशन शंभर वेळा तरी सांगितलं गेलं तेवढंच कमी होतं म्हणून अंत्ययात्रेचे पंधरा हजार रुपये दिले हे बोलून दाखवलं सरकारी नोकरीत राहून हुतात्मा बनण्याची चूक कधी करू नका या देशात खुनाचा गुन्हा माफ होतो भ्रष्टाचार करून तुरुंगातून सुटलेले आम जनतेत ताठ मानेनं वावरू शकतात पण हुतात्मा बनल्यावर तुम्ही समाजाकडून दूर फेकले जाता.

या देशात हुतात्मा बनण्याचा गुन्हा कधी करू नका.

हुतात्म्यांना फाशी द्यायचं, की हौतात्म्य जिवंत ठेवायचं ते तुम्ही आता ठरवणार आहात ,आम्ही लावलेली मशाल तुम्हीच पेटती ठेवणार आहात.

शब्दांकन:कविता हेमंत करकरे

Leave a comment