भारतातील सर्वांत लोकप्रिय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यटन स्थळ म्हणजे विवेकानंद शिला होय. स्वामी विवेकानंद यांच्या जीवन प्रवासातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे विवेकानंद शिला होय. समुद्रात दिसणार्या खडकावर जाण्यासाठी नावाड्याला देण्यासाठी पैसे नसल्यामुळे 500 मीटर अंतर पोहत जाऊन ज्या खडकावर स्वामी विवेकानंद तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. तोच हा खडक म्हणजे विवेकानंद शिला होय.शिला म्हणजे दगड, खडक. आज हा खडक जगप्रसिद्ध झाला आहे. याच खडकाची म्हणजेच विवेकानंद शिलेची आपण माहिती घेणार आहोत.
ठिकाणाचे नाव: विवेकानंद शिला.
ठिकाण : कन्याकुमारी.
समुद्र सपाटीपासून उंची : 10 ते 15 मीटर
समुद्र किनाऱ्यापासून अंतर: 500 मीटर
जवळचे ठिकाण : कन्याकुमारी
जिल्हा : कन्याकुमारी
राज्य : तमिळनाडू
विवेकानंद शिला स्थापना : 2 सप्टेंबर 1970
विवेकानंद शिला पाहण्यास कसे जाल ? How to go to see Vivekanand Shila?
* चेन्नई या राजधानीच्या ठिकाणाहून कन्याकुमारी सुमारे 700 किलोमीटरवर आहे. कन्याकुमारीचा समुद्र किनारा ते विवेकानंद शिला 500 मीटर अंतर आहे.
* केरळ राज्यातील कोची या शहरापासून कन्याकुमारी 302 किलोमीटर अंतरावर आहे.
* मदुराईपासून (तमिळनाडू) कन्याकुमारी 245 किलोमीटर अंतरावर आहे
* केरल राज्यातील तिरुअनंतपुरम या शहरापासून कन्याकुमारी 98 किलोमीटर अंतरावर आहे.
विवेकानंद शिलेची स्थापना: Installation of Vivekanand Rock Memorial:
स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कन्याकुमारी समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटर दूर असलेल्या एका भव्य खडकावर विवेकानंद शिला स्मारक [vivekanand Shila Memoriol] या नावाने स्मारक उभारण्याचे ठरले. 12 जानेवारी 1963 रोजी पासून विवेकानंद जन्म शताब्दी वर्ष सुरु झाले होते. 12 जानेवारी 1963 रोजी विवेकानंद स्मारक समिती निर्माण झाली.17 जानेवारी 1963 रोजी शिलान्यास करण्याचे ठरले होते. पण यापूर्वीच या खडकाला ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सेंट जेवियर असे नाव दिले होते. या खडकावर क्रॉसचे चिन्ह असलेला पुतळा बसवलेला होता. त्यामुळे 16 जानेवारी 1963 रोजी मिशनरी आणि स्मारक समिती यांच्यात तणाव निर्माण झाला होता; पण पुढे मार्ग निघाला आणि स्मारकाचे काम सुरु झाले. जानेवारी 1963 ते जून 1970 अखेर विवेकानंद शिला स्मारकाचे काम चालू होते. अखेर ते काम पूर्ण झाले. या खडकावर स्वामी विवेकानंद यांचे सुंदर मंदिर उभारलेले आहे.तसेच विवेकानंद यांचा पुतळा सुद्धा उभारलेला आहे. सभोवार चहूबाजूंनी अरबी समुद्र, मध्येच खडकावर विवेकानंद शिला स्मारक! सर्वच अद्भुत ! समुद्राच्या लाटांचा खळखळाट । अफाट समुद्र ! सर्व काही प्रचंड नेत्रसुख देणारे आणि उत्साह निर्माण करणारे असेच आहे.
2 सप्टेंबर 1970 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती व्ही. ही गिरी आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते विवेकानंद शिला स्मारकाचे उद्घाटन झाले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी होते. प्रचंड उत्साहात हा विवेकानंद शिला स्मारक उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रचंड स्थानिक नागरिकांसह आर. एस. एस. संघटनेचे स्वयंसेवक प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कन्याकुमारी येथेच विवेकानंद शिला स्मारक का? Why Vivekananda rock Memorial at Kanyakumari ?
कन्याकुमारी येथील समुद्र किनाऱ्यापासून 500 मीटर अरबी समुद्रात एक खडक आहे. या खडकाला विवेकानंद शिला का म्हणतात ? या खडकावरच विवेकानंद शिला स्मारक [Vivekananda rock Memorial] का बांधण्यात आले ? या पाठीमागे एक इतिहास आहे. तो इतिहास असा आहे—–
एक वेळ अशी होती की स्वामी विवेकानंद लहानपणीच नास्तिकवादाकडे वळले होते. त्यांच्या वयाच्या 18 व्या वर्षी म्हणजे 1881 साली विवेकानंद यांची भेट स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली.परमहंस यांनी त्यावेळी गाणे म्हणण्यास सांगितले होते. विवेकानंद यांचे गाणे ऐकून स्वामी रामकृष्ण प्रभावित झाले होते. विवेकानंद पाच वर्षे परमहंस यांच्या संपर्कात राहिल्यावर त्यांनी स्वतःच परमहंस यांना गुरु मानले होते. एखाद्या व्यक्तीला स्वतःहून गुरु मानणे खूप महत्त्वाचे असते.
1892 साली विवेकानंद भारत भ्रमंतीला निघाले होते. फिरत फिरत (पायीच) ते कन्याकुमारीला आले. भारताचे दक्षिणेकडील शेवटचे भूटोक म्हणजे कन्याकुमारी होय. येथे आल्यावर ते खूपच प्रभावित झाले.त्यांना अरबी समुद्रातील 500 मीटरवर असलेला खडक दिसला. त्या खडकावर अनेक लोक छोट्या छोट्या बोटींतून जात होते; पण विवेकानंद यांच्याकडे बोटीतून खडकापर्यंत जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यापूर्वीच त्यांनी संन्यस्त जीवन स्वीकारले होते. नावाड्याला विनंती केली. पण तो पैश्याशिवाय बोटीत घ्यायला तयार होईना. शेवटी विवेकानंद यांनी समुद्रात उडी मारली आणि पोहत ते खडकावर पोहोचले. तेथेच काही वेळ त्यांनी चिंतन (तपश्चर्या) केले. आणि पुन्हा ते समुद्र किनाऱ्याकडे आले. हा प्रसंग विवेकानंदांनी आपल्या व्याख्यानांतून (प्रवचनातून) अनेक ठिकाणी सांगितला होता.त्यामुळे तो चित्तथरारक प्रसंग अनेकांना भावला होता.
त्यामुळेच 12 जानेवारी 1963 रोजी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त या अरबी समुद्रातील खडकावर विवेकानंद यांचे स्मारक उभारण्याचे ठरले. आणि त्या स्मारकाला ‘विवेकानंद शिला स्मारक’ असे नाव देण्यात आले.
स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय : Life Introduction of Vivekananda.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. लहानपणी ते खूप देवाची भक्ती करत असत; पण देवाचा त्यांना अजिबात प्रतिसाद मिळत नव्हता.म्हणून त्यांच्या मनात हळूहळू नास्तिकवाद निर्माण होऊ लागला. वयाच्या 18 त्या वर्षी ते स्वामी रामकृष्णा परमहंस यांच्या संपर्कात आले. नरेंद्रनाथ दत्त असे विवेकानंद यांचे नाव होते.याच वर्षी म्हणजे 1882 मध्ये ते रामकृष्ण परमहंस यांच्या संपर्कात राहिल्यावर त्यांनी स्वतःच परमहंस यांचे शिष्यत्व पत्करले. परमहंस यांचे ते आवडते शिष्य झाले. 1882 ते 1886 या काळात विवेकानंद परमहंस यांच्या संपर्कात होते. त्यानंतर त्यांनी आपला देश समजून घेण्यासाठी भारत भ्रमंती सुरु केली. फिरत फिरत ते कन्याकुमारीला आले. तेथील समुद्रातील खडकावर पोहत जाऊन तपश्चर्या केली. आणि परत आले. पुढे 1893 मध्ये 11 सप्टेंबर रोजी शिकागो येथे सर्व धर्म परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले. अमेरिकेतील शिकागो परिषदेत प्रत्येक विद्वान आपापल्या धर्माची ख्याती सांगत होता. विवेकानंद यांना दहा मिनिटांचा वेळ मिळाला होता. सुरुवातीलाच त्यांनी My brothers and sisters अशी सुरुवात करून टाळ्यांचा कडकडाट मिळवला. येथेच त्यांनी जग जिंकले होते. भारतीय तत्त्वज्ञानाचे सार या दोन शब्दांत होते, पुढील वेळेत त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्त्व जगाला पटवून दिले. परमहंस यांच्या मृत्यूनंतर स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. जगभर फिरुन भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. दुर्देवाने 4 जुलै 1902 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी त्यांचा मृत्यू आला.
स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान: Philosophy of Swami Vivekananda
स्वामी विवेकानंद हे जन्माने हिंदू होते; पण ते संपूर्ण जगभर फिरून व्याख्याने देत असताना हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, मुस्लिम धर्मातील चांगल्या गोष्टी सांगत. सर्व धर्मातील तत्त्वज्ञानातील निवडक चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार ते करत असत. त्यामुळे त्यांची व्याख्याने जगभर गाजत. आध्यात्मवाद या विषयावर त्यांची अनेक व्याख्याने प्रसिद्ध झालेली आहेत. विवेकवाणी म्हणून त्यांची भाषणे प्रसिद्ध आहेत.