देहू :तुकाराम मंदिर: Dehu Temple

Dehu आणि संत तुकाराम यांचे घनिष्ठ संबंध आहेत.कारण संत तुकाराम यांचा जन्म Dehu गावातच झाला. आणि मृत्यूही देहू गावातच झाला. त्यांनी लिहिलेला ‘गाथा’ हा ग्रंथ सनातनी लोकांनी Dehu गावच्या इंद्रायणी पात्रात बुडवली. त्यामुळे देहू गावाशी संत तुकाराम यांची किती नाळ आहे, याची कल्पना आपल्याला येते. आजही देहू गाव आणि देहू गावची संस्कृती संत तुकाराम महाराज यांच्याच भोवती फिरते. संपूर्ण महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा वारसा निर्माण करण्याच्या कामात संत तुकाराम अग्रभागी आहेत. म्ह‌णूनच संत शिरोमणी ही तुकारामांना दिलेली उप‌मा सार्थ ठरते. त्याच संत तुकाराम महाराजांविषयी आणि देहू गावा विषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत.

देहूला कसे जायचे? How to go to see Dehu?

पुण्याहून देहूला बसने, खासगी वाहनाने जाता येते. स्वारगेट ते देहू अंतर 31 किलोमीटर आहे.

पिंपरी-चिंचवड बसस्थानकापासून देहूला जाता येते. पिंपरी-चिंचवड पासून देहू 14 किलोमीटर अंतरावर आहे.

मोशीपासून दहा केवळ 11 किलोमीटर अंतरावर आहे.

तुम्ही आळंदीला गेला असाल तर आळदीपासून देहू 16 किलोमीटर अंतरावर आहे.

तुम्ही चाकणचा किल्ला पाहायला गेला असाल तर चाकण पासून देहू 16 किलोमीटर आहे.

पंढरपूर ते देहू अंतर 240 किलोमीटर आहे. संत तुकारामाची पालखी दरवर्षी आषाढी एकाद‌शीला देहूतून पंढरपूरला जाते.

देहू कशासाठी प्रसिद्‌ध आहे ? What is Dehu Famous For?

देहू हे संत तुकारामांचे जन्म गाव आहे. संत तुकारामांचा मृत्यू देहू गावातच झाला असल्याने त्यांचे मंदिर, समाधी या देहू गावातच आहेत. तुकारामांनी आपल्या राहत्या घरी बसून ‘गाथा’ लिहिली. ते राहते घर आजही पाहायला मिळते .तुकारामांची संपूर्ण गाथा भिंतीवरील मार्बलमध्ये कोरलेली आहे. ते गाथा मंदिर देहू गावातच आहे.

देहूमधील प्रसिद्ध ठिकाणे; Famous Places in Dehu

सध्या देहूतील सर्वात लोकप्रिय आणि अप्रतिम ठिकाण म्हणजे गाथा मंदिर होय. त्या गाथा मंदिराची माहिती घेऊया.

1) संत तुकाराम गाथा मंदिर, Tukaram Gatha Mandir

संत तुकारामाच्या वैकुंठस्थान मंदिरापासून गाथा मंदिर एक किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर मूळ गावापासून दूर आहे. देहू गावाच्या माळरानावर बांधलेले आहे. जवळ जवळ साडेसात एकरच्या जागेत अत्यंत सुंदर आणि देखणे हे मंदिर पाहता क्षणीच मन भरून येते. येथील स्वच्छता, प्रसन्न वातावरण, शांतता सर्वच काही मनाला भावते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आतील भिंतीवर मार्बलमध्ये फरशीवर संपूर्ण तुकाराम गाथा कोरलेली आहे. येथे काही वेळ बसून तुकाराम गाथा निश्चित वाचावी. मनन करावे. चिंतन करावे आणि तुकारामाची विचार धारा घेऊन बाहेर पडावे. मंदिरात मुख्य कळसाच्या खाली संत तुकारामांची पंचधातूची सुंदर मूर्ती आहे. तिचे दर्शन घ्यावे

(2) संत तुकारामाचे घर. House of Saint Tukaram

देहू गावात जेथे संत तुकाराम प्रत्यक्ष राहत होते, ते जुने घर आजही पाहायला मिळते. या घराचा जीर्णोद्धार केलेला आहे; पण मूळ घर जसे आहे तसेच ते ठेवलेले आहे. हे घर पाहताना नक्कीच सतराव्या शतकातील तुकारामाच्या घरातील माणसे, कुटुंबीय ,तुकाराम कसे असतील ? हे सारे आठवते. येथे तुकारामाच्या घरातील काही वस्तू आहेत. संत तुकारामाचे वडील सावकार होते. ते इतरांना कर्ज देत असत. काही काळ तुकारामांनीही हा व्यवसाय केला होता, पण नंतर मनाला पटेना. म्हणून बंद केला.

3) संत तुकाराम वैकुंठस्थान मंदिरः Tukaram Vaikunthasthan Mandir

संत तुकारामाचे जेथून वैकुंठाला गमन झाले. ते स्थान म्हणजे संत तुकाराम वैकुंठस्थान मंदिर होय. वैकुंठ गमन म्हणजे मृत्यू या अर्थाने हा शब्द प्रयोग केलेला आहे.

संत तुकारामाचा वैकुंठप्रवास ही फार मोठी घटना आणि कट कारस्थान आहे. संत तुकारामांनी कर्मकांडाला पूर्णतः नाकारले. सोवळ्या ओवळ्याच्या परंपरागत कल्पना नाकारल्या, यज्ञ, श्राद्ध, भविष्यकथन, शुभाशुभ, नवस, ककल, उपवास, तीर्थयात्रा, वनवास, संन्यास, गुहेतील ज्ञान, मोक्ष या परंपरागत गोष्टी पूर्णतः नाकारून त्यांनी शुद्ध भावना, शुद्ध आचरण याला महत्त्व दिले. पर धनाला आणि पर नारीला हात लावू नये. ही शिकवण त्यांनी दिली. तुकारामांचा धर्म पारलौकिक मूल्यांवर नव्हे, माणुसकीवर आधारलेला होता. रंजल्या गांजल्यांना आपलेसे करणारा होता. कर्मकांड करणाऱ्या साधूची पूजा करण्यापेक्षा खऱ्या, सदाचारी, सद्‌वर्तनी, स्वच्छ, निष्कलंक साधूची आवश्य पूजा करा. अशी शिकवण त्यांनी दिली म्हणूनच सनातनी लोकांनी त्यांना विरोध केला. हा विरोध इतका विकोपाला गेला की एक दिवस त्यांना इंद्रायणीच्या वाळवंटात या सनातन्यांनी गाडले.आणि संत तुकाराम पुष्पक यानातून गेल्याची अफवा उठवली. ज्या ठिकाणी तुकारामाला गाडले, ते ठिकाण म्हणजे वैकुंठ स्थान मंदिर होय.येथे जाऊन संत तुकारामाचे आवश्य दर्शन घ्यावे.

3.तुकारामाची गाथा इंद्रायणीत बुडवली: Tukaram Gatha Immersed in Indrayani.

संत तुकारामाला वैकुंठाला पाठवण्यापूर्वी त्यांचे विचारच नष्ट करण्यासाठी सनातनी लोकांनी तुकारामाच्या घरात घूसून त्यांनी लिहिलेल्या गाथेचे हस्तलिखित आणि तुकारामाला घेऊन इंद्रायणी काठी आले. तेथे तुझी पांडुरंगावर भक्ती आहे का ? असे संत तुकारामांना विचारले. तुकारामांनी ‘हो’ म्हटले. मग या सनातन्यांनी गाथेला मोठी शिळा बांधून ती गाथा इंद्रायणीत बुडवली. आणि तुझी भक्ती जर खरी असेल तर पांडुरंग गाथा जशी च्या तशी आणून देईल. असे सांगितले, असे घडणारच नाही हे तुकारामासकट सर्वांना माहीत होते. तुकारामांनी आयुष्यभर मेहनत करून लिहिलेली गाथा इंद्रायणीत बुडवल्यामुळे त्यांना खूप वेदना झाल्या, दुःख झाले, तेरा दिवस ते इंद्रायणी काठी अन्न पाण्याविना बसले होते. या काळात तुकारामांवर प्रेम असलेले अनेक वारकरी, जमा झाले. त्यांनी तुकारामाला उपोषण मागे घ्यायला लागले .आम्हाला तुमचे अभंग पाठ आहेत. सगळे मिळून पुन्हा गाथा लिहू असे सांगितले. त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र बसून पुन्हा गाथा तयार केली. माणसाला मारुन विचार मरत नसतात हेच या प्रसंगातून दिसते.

संत तुकाराम जीवन परिचयः Life Introduction of Saint Tukaram

संत तुकाराम यांचा जन्म 21 जानेवारी 1608 रोजी झाला. लहानपणापासून त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार होते. त्यामुळे ते पांडुरंगाचे वारकरी झाले. त्यांच्या घरी वडिलार्जित सावकारकीचा व्यवसाय होता.तुकारामांना कर्तेपणाचा समज येण्यापूर्वीच त्यांचे वडील वारले. कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली.काही दिवस त्यांनी सावकारकी केली. त्यांच्या बुद्धीला सावकारकीचा व्यवसाय पटत नव्हता. म्हणून ते भांबनाथाच्या डोंगरावर जाऊन तासन् तास बसत असत. चिंतन करत असत. एके दिवशी त्यांना साक्षात्कार झाला, पण हा साक्षात्कार गौतम बुद्धांच्या साक्षात्कारासारखा होता. साक्षात्कारानंतर तुकारामांनी पहिले पाऊल उचलले ते म्हणजे आपल्या सावकारकीची पोथडी इंद्रायणीत बुडवली. सर्व कर्जदारांना कर्जातून मुक्त केले. आणि सावकारकीचा धंदा कायमचा बंद केला. गोर गरिबांचे शोषण होते, याची जाणीव तुकारामांना झाली होती. सदाचार, सद्‌वर्तन, सच्छील, चारित्र्यसंपन्न तुकारामांनी कर्मकांडासारख्या गोष्टी नाकारत गाथा’ लिहिली. या गाथेतून त्यांनी पुरोगामी विचारांचा वारसा जपला.त्यामुळेच त्यांचा सनातनी लोकांनी 19 मार्च 1650 रोजी खून केला.

तुकाराम आणि शिवराय भेट : Tukaram and Shivaji Meet

संत तुकाराम वारले त्या वेळी शिवाजी महाराज केवळ 20 वर्षाचे होते. तुकारामांनी कर्मकांडाविरुद्‌ध चालवलेली मोहीम शिवरायांच्या कानावर आली होती. म्हणूनच त्यांच्या कार्याला प्रोत्साहान देवासाठी शिवरायांनी भेट देऊन त्यांना बळ दिले. तुकारामांनी समर्थपणे आपला वारसा पुढे चालू ठेवला.

तुकाराम पालखी सोहळा: Tukaram Palakhi festival

संत तुकारामाच्या पालखी सोहळाची सुरुवात दरवर्षी देहूगावगातून होते, तेथून पुढे आकुर्डी-पुणे-लोणी काळभोर-यवत – वरखंड – बारामती सणगर – निमगाव – इंदापूर-अकलूज वाखरी आणि पंढरपुर असा हा 20 दिवसांचा पालखी सोहळा असतो. विसांव्या दिवशी पालखी पंढरपुरात
पोहोचते. पंढरपूरला येणाऱ्या दोनच मानाच्या पालख्या आहेत. तुकाराम पालखी आणि ज्ञानेश्वर पालखी. या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून तुकारामाच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे. हीच अपेक्षा. ज्या तुकाराम महाराजांनी आयुष्यभर कर्मकांडाला विरोध केला, तीच कर्मकांडे या पालखी सोहळ्यातून होऊ नयेत.

2 thoughts on “देहू :तुकाराम मंदिर: Dehu Temple”

  1. जगतगुरु तुकाराम महाराजांनी १६ शतकात कर्मकांडवर प्रहार केला आणि आपन आजही कर्मकांडाला मानत बसतो ईतकी वर्ष वारी,प्रवचन करून तुकोबा राया आपल्याला कळलेच नाहीत.
    तुकाराम महाराजांच्या बदल खरी माहिती आपल्यासारख्या लेखकांच्यामूळे कळेल

    Reply

Leave a comment