Charminar : चार मिनार हैद्राबाद

आंध्रप्रदेशची जुनी राजधानी आणि सध्याची तात्पुरती राजधानी म्हणजे हैद्राबाद होय. या हैद्राबाद‌चे तेलंगणा राज्याच्या नवनिर्मिती मुळे विघटन आहे. हैद्राबाद ही तेलंगणा राज्याची राजधानी आहे. या हैद्राबाद मध्ये बिर्ला मंदिर, चारमिनार, बिर्ला प्लॅनेटेरिअम, जिब्राल्टर रॉक, 350 टन वजनाचा 17.5 मीटर उंचीचा भगवान बुद्धाचा पूर्णाकृती पुतळा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
त्यापैकी आता आपण चार मिनार (Charminar) बद्दल माहिती घेणार आहोत.

चार मिनार- Charminar:-

1) चार मिनार कोठे आहे? Where is Charminar?

चार मिनार तेलंगणा राज्यातील हैद्राबाद शहरात आहे. इ.स. 1591 मध्ये बांधलेली ही इमारत (वास्तू) आजही डौलाने उभी असून ही वास्तू म्हणजे एक मशिद असून हैद्राबाद शहराचे प्रमुख आकर्षण आहे.

2. चार मिनार कोणी बांधला ? Who has buit Charminar?

तेलंगणा राज्यातील हैद्राबाद शहरात इ स. 1591 मध्ये सुलतान मुहम्मद कुली कुतुबशाह याने चार मिनार बांधला आहे. ही वास्तू अशी आहे, की या वास्तूच्या चारी बाजूला चार मनोरे आहेत. चार मनोऱ्यांच्या आधारावर उभारलेली ही वास्तू म्हणजे एक स्मारकच आहे. चार मिनार ही वास्तू सुलतान मुहम्मद कुली कुतुबशाह याने त्याची पत्नी हिच्या स्मरणात बांधला गेला आहे.

3. चार मिनार का बांधला गेला ? Why did Charminar built?

इ.स. 1591 मध्ये सुलतान मुहम्मद कुली कुतुबशाह याने चार मिनार का बांधला?याचे निश्चित कारण सांगता येत नसले, तरी ती कोणती कारणे आहेत, ते आपण पाहू.

1. सुलतान मुहम्मद कुली कुतुबशाह याने आपली प्रिय पत्नी भानमती हिच्या स्मरणार्थ हैद्राबाद येथे चार मिनार बांधला आहे. 2024 साली या इमारतीला 433 वर्षे झाली. आजही ही इमारत सुस्थितीत आहे.

2. दुसरे कारण असे की सुलतान मुहम्मद कुली कुतुबशाहचे जावई करबलाच्या लढाईत मारला गेला. त्याच्या स्मरणार्य हा चार मिनार (CharMinar) बांधला गेला.

3.चार मिनार बांधण्याचे तिसरे कारण असे सांगितले जाते की त्यावेळी हैद्राबादमध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातले होते.त्यांतून बचाव करण्यासाठी चार मिनार ही वास्तू बांधली गेली. अर्थात चार मिनार कोणत्या कारणासाठी बांधला यावर इतिहास‌कारांच्यात एकवाक्यता दिसत नाही.

नाशिक- पंचवटी:Panchavati Nashik

चार मिनार ची वास्तू :Building of Charminar

चार मिनार ही वास्तू चुना, ग्रॅनाईट दगड, वाळू, संगमरवर इत्यादी साहित्य वापरून बांधली असून ही इमारत एक चौरसाकृती आहे. हिच्या चार कोपऱ्यावर चार मनोरे (Towers) आहेत. यावरुनच या इमारतीला चार मिनार असे नाव पडले आहे. प्रत्येक मिनार 56 मीटर उंच आहे .आजही सुस्थितीत असलेली असलेली ही इमारत हैद्राबाद शहरात गेल्यावर आवश्य पाहण्याचा लाभ घ्यावा.

Leave a comment