Kangchenjunga Peak: कंचनजंगा

हिमालय हे अनेक पर्वत रांगांचे, बर्फाच्छादित हिमशिखरांचे आगार आहे.जगातील सर्वांत उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे शिखर हिमालयातच आहे. याच हिमालयात कांचनगंगा हे तमाम भारतीयाचे आवडते ठिकाण आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत उंच शिखर म्हणजे कांचनगंगा होय. या शिखराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे शिखर भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या सीमारेषांवर आहे. भारतीय 100 रुपयाच्या चलनी नोटेवर कांचनगंगेलाच स्थान का दिले गेले? माऊंट एव्हरेस्टला का नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखात निश्चित मिळतील.

कंचनजंगा शिखराची संक्षिप्त माहिती. Brief Information of Kangchenjunga

*ठिकाणाचे नाव : कंचनजंगा

ठिकाण कोठे आहे: हिमालय

समुद्र सपाटीपासून उंची: 8586 मी

राज्य : सिक्कीम

देश :भारत आणि नेपाळ

दार्जिलिंग पातून अंतर :

कंचनजंगा शिखर पाहायला कोणी जावे ? Who should go to Kangchenjunga Peak?

1 . कंचनजंगा शिखर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. त्यामुळे माऊंट एव्हरेस्ट आणि कांचन गंगा यांच्यातील चढाईमध्ये फारसा फरक नाही. अशा ठिकाणी फक्त अनुभवी गिर्यारोहकच (Mountaineer) जाऊ शकतात. ज्यांना गिर्यारोहणाचा अनुभव नाही त्यांनी दार्जिलिंग येथील टायगर हिल या टेकडीवरून कंचनजंगा शिखर पाहण्याचे नेत्रसुख घ्यायला हरकत नाही.

2.गिर्यारोह‌काचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार हा हिमशिखरांवर चढाण्याचा अनुभव असणारे गिर्यारोह‌क आणि दुसरा प्रकार म्ह‌णजे सह्याद्री, सातपुडा या सारख्या पर्वतातील शिखरे चढण्याचा अनुभव असणारे गिर्यारोहक होय. यांतील हिम शिखरांवर चढण्याचा अनुभव असणाऱ्या गिर्यारोहकांनी आवश्य कंचनजंगा शिखरावर ट्रेकिंग करून कांचनगंगा शिखर सर करण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही.

3. कंचनजंगा सर करणारी प्रियांका मोहिते ही भारतातील पहिली महिला आहे. प्रियांका ही महाराष्ट्रीयन आहे. तिचे अनुभव गिर्यारोहकांना निश्चितच उपयोगी पडतील.

कसे जायचे कंचनजंगा शिखरावर ?How to go to see Kangchenjunga Peak?

1. जे गिर्यारोहक नाहीत, त्यांना कंचनजंगा पाहायला जायचे असेल तर त्यांनी पश्चिम बंगाल राज्यातील उत्तरेच्या टोकाला असलेल्या दार्जिलिंग या थंड हवेच्या ठिकाणी जायला हवे. दार्जिलिंगला गेल्यावर तेथून भल्या पहाटे उठून टायगर हिलवर जायचे. सकाळी सूर्योद‌याच्या वेळी कंचनजंगा शिखरावर सूर्य किरणे पडतात. बर्फाच्छादित कंचनजंगा शिखर जेथून स्पष्ट दिसते तुमच्याजवळ दुर्बिण असेल तर अधिक उत्तम. तेथे गेल्यावर आणखी एक गंमत पाहायला मिळते. ती गंमत म्हणजे येथून कंचनजंगा शिखर माउंट एव्हरेस्ट शिखरापेक्षा उंच दिसते हा केवळ भौगोलिक चमत्कार आहे.

2. गिर्यारोह‌कांसाठी कंचनजंगा शिखरावर जाण्याचे अनेक (दोन-तीने) मार्ग आहेत. नेपाळ मार्गे जायचे असेल तर काठमांडू ते भद्रपुर फ्लाइट आहे. त्यानंतर पुढे विर्तामोड लागते. त्यापुढे तपलेयुज हे ट्रेकिंगचे (Trekking) ठिकाण लागते येथून पुढचा प्रवास ट्रेकिंग ने करावा लागतो.

दार्जिलिंगमधून कंचनजंगा पाह‌ण्यासाठी जायचे असेल तर 20 ते 22 दिवस लागतात .दार्जिलिंग मानेभंजंग- होंगलू – गैरी – बाससंदकपू – फलूत – रामन- रिबिक- युक्सम- शोका- झोंगरी- यांगालिंग- लमुने – गोचला- युक्तोम बागडोगरा असे पुढे जाता येते. वरील कंचनजंगा परिसरातील पाहण्याची ठिकाणे आहेत. प्रत्यक्ष कंचनजंगा शिखरावर जाण्याचा मार्ग याहून वेगळा आहे.

माउंट आबू: Mount Abu

कंचनजंगा शिखरावर जाताना कोणते साहित्य ध्यावे? What materials to take while going to Kangchenjunga Peak?

कंचनजंगा हे बर्फाच्छादित शिखर आहे. त्यामुळे प्रचंड थंडी पासून संरक्षण होण्यासाठी आपल्याजवळ ऊबदार कपडे, स्वेटर, काळा गॉगल, कानटोपी, हातमोजे, पायमोजे, शूज इत्यादी साहित्य आवश्यक आहे रात्री झोपण्यासाठी थंडी प्रतिबंधात्मक मजबूत, दर्जेदार आणि कमी वजनाचा तंबू आवश्यक आहे. ऊर्जा निर्मिती साठी कॉफी, चहा, अन्य Drinks आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याची बाटली, ड्राय फ्रुट्स घ्यावे. बरोबर मर्यादित ओझे असावे.

दार्जीलिंग: Darjeeling

Base camp to Top of the Peak Kangchenjunga:

आपल्याला जगातील सर्वात उंच तिसऱ्या क्रमांकाच्या शिखरावर जायचे आहे. त्यामानाने अनेक कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची मानसिकता ठेवण्याची आवश्यकता आहे. प्रचंड थंडी, उन्हें तापमान, बर्फाचे कोसळणारे ढिगारे, बर्फवृष्टी, बर्फाचे वाद‌ळे शुभ्र बर्फावर पडणारे प्रखर सूर्यकिरणे, सुरक्षित ठिकाणी मुक्काम, बर्फाने झाकलेल्या गळी, हिम शिखरावर चढ‌ण्याचे धाडस या सर्व गोष्टींकडे आपण धीराने सामोरे जाणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत मानसिक धैर्य खचता कामा नये, याची दक्षता घेतली पाहिजे.

कंचनजंगा – Kangchenjunga: Meaning

कांचन म्हणजे सुवर्ण, सुवर्ण म्हणजे सोने, सोन्याचा रंग तेजस्वी पिवळा असतो. सकाळच्या प्रहरी सूर्यकिरणे कंचनजंगा शिखरावरून पडतात आणि आपण हे दृश्य जेव्हा दार्जिलिंगच्या टायगर हिलवरून पाहतो, तेव्हा या शिखराला मनमोहक सुवर्ण झळाळी येते. यावरुनच कंचनजंगा म्हणजे सोन्याची गंगा असे नाव पडले आहे. भारतातील एक सौंदर्य संपन्न असे शिखर म्हणजे कंचनजंगा शिखर होय.

भारतीय चलनी नोटेवर माऊंट एव्हरेस्ट ऐवजी कंचनजंगा शिखराचे चित्र का आहे?

आपण भारतीय 200रू च्या नोटेवर जे शिखराचे चित्र आहे, ते कंचनजंगा शिखराचे चित्र आहे. माउंट एव्हरेस्टचे नाही. माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर असूनही त्याचा फोटो चलनी नोटेवर नाही. याचे कारण म्हणजे माऊंट एव्हरेस्ट हे आपल्या भारतात नाही. त्यामुळे त्याला चलनी नोटेवर स्थान दिलेले नाही. कंचनजंगा हे भारतीय सर्वोच्च शिखर आहे. त्याचे सौंदर्य अप्रतिम आहे. भारताचे वैभव आहे. म्हणून 100 रुपयांच्या चलनी नोटेवर कंचनजंगा या शिखराचा फोटो आहे.

Leave a comment