Jog falls : जोग धबधबा

कर्नाटक राज्यातील प्रमुख आकर्षक आणि जगप्रसिद्ध धबधबा म्हणजे गिरसप्पा धबधबा होय. गिरसप्पा धबधब्यालाच Jog falls धबधबा असेही म्हणतात. कर्नाटक राज्यातील शरावती नदीवर हा Jog falls आहे. हा गिरसप्पा धबधबा [ Girsappa falls] आशिया खंडातील सर्वांत उंच धबधबा असून या धबधब्याची आपण माहिती घेऊया.

गिरसप्पा/जोग धबधब्याची संक्षिप्त माहिती: Brief Information of Girsappa/Jog falls.

ठिकाणाचे नाव : गिरसप्पा धबधबा

दुसरे नाव : जोग धबधबा

नदी : शरावती

धबधब्याची उंची : 253 मी

नदीचे उगमस्थान : अंबुतीर्थ

उगमस्थानापासून अंतर: 19 किमी.

जिल्हा : शिमोगा

शिमोगा पासून अंतर : 100 किमी

कसे जायचे गिरसप्पा धबधबा पाहायला ? How to go to see Jog falls.?

महाराष्ट्रातून जोगचा धबधबा पाहायला जाताना हुबळी मार्गे जावे लागते . हुबळी ते जोग अंतर 150 किलोमीटर आहे.

तुम्ही गोकर्ण महाबळेश्वर पाहायला गेला असाल तर गोकर्णपासून गिरसप्पा धबधबा 112 किलोमीटर अंतरावर आहे. साधारणत: 2 ते 2.5 तासात धबधबा पाहायला जाता येते.

शिमोगा या जिल्ह्याच्या ठिकाणाहून जोगला जाता येते. शिमोगा पासून 100 किलोमीटर अंतरावरील जोग कसा आहे गिरसप्पा धबधबा? : How is Girsappa falls?

कर्नाटक राज्यातील जोग या गावापासून अडीच [2.5km] किलोमीटर अंतरावर गिरसप्पा धबधबा आहे . शरावती नदीच्या उगम स्थानापासून अवघ्या 19 किलोमीटर अंतरावर असलेला हा गिरसप्पा धबधबा जून ते ऑक्टोबर महिन्यांत प्रवाहित असतो. 253 मीटर उंचीवरून पडणारा हा धबधबा आशिया खंडातील सर्वांत उंचावरून पडणारा धबधबा म्हणून या धबधब्याकडे पाहिले जाते. धबधब्याला जेवढी उंची अधिक, तेवढे सौंदर्य अधिक. जोगच्या या धबधब्याला नैसर्गिक सौंदर्य, लाभलेले आहे. तसेच नैसर्गिक उंची लाभलेली आहे. 253 मीटर म्हणजे 830 फूट . 830 फुटावरून पड‌णारे पाणी कसे दिसत असेल ? त्याचे तुषार किती दूरपर्यंत उडत असेल ? शुभ्र दुधाळ रंगाचे पाणी पाहाताना किती मनमोहक दृश्य दिसत असेल ? सभोवार गर्दा राई आणि त्यामध्ये उंचावरून पडणारा धबधबा! हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि आपल्या जवळील कॅमेरात इथल्या स्मृती टिपण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष जोग या ठिकाणी गेले पाहिजे. पावसाळयात अति पावसाच्या वेळी न जाता मध्यम किंवा कमी पावसाच्या वेळी जोगला गेल्यास तेथील सौंद‌र्याचा आस्वाद घेता येईल.

जलविद्युत निर्मिती:जोग. Hydroelectricity Generation: Jog.

1943 साली जोगच्या धरणाच्या उजव्या तीरावर पॉवर हाऊसची योजना म्हैसूर सरकारने कार्यान्वित केली आहे. या पॉवर हाऊसची निर्मिती करताना धबधब्याचे सौंद‌र्य कमी होणार नाही याची काळजी घेतली आहे.

कर्नाटकातील पर्यटन स्थळे : Best places to visit in karnataka

 

Leave a comment