काही वृक्ष फळांमुळे प्रसिद्ध झालेले आहेत, तर काही वृक्ष त्यांना लाभलेल्या फुलांमुळे प्रसिद्ध आहेत. भारतात आढळणारे गुलमोहरचे झाड असेच आहे. वसंत ऋतुनंतर या वृक्षाला बहर येतो. या वृक्षाला लाल रंगाच्या फुलांची उधळण होते. त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय पट्ट्यातील Amazon rainforest मध्ये Ceiba Pentandra हा वृक्ष आपणास पाहायला मिळतो.हा वृक्ष मुळचा मेक्सिको, आशिया खंड, आफ्रिका खंड, उत्तर अमेरिकेचा या प्रदेशातील आहे.या वृक्षाला बहर आला की शेंगा लागतात. शेंगांतील बियांपासून या कपोक झाडाची पुर्नर्मिती होती. या झाडाची उंची सुमारे 80 मीटर पर्यंत असू शकते. याचा बुंधाही खूप मोठा असतो. सुमारे 3 मीटर व्यासाचा बुंधा असतो. 20 फुटांपर्यंत त्याचा घेर असतो. मलेशिया, चीन, फिलिपाईन्स या देशातही ही झाडे आढळतात. परंतु या वृक्षांची सर्वात जास्त संख्या दक्षिण अमेरिकेन आढळते. या वृक्षावर वटवाघळे आश्रयाला बसतात. मधमाश्यांची पोळेही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या वृक्षांच्या बियांमध्ये मोठया प्रमाणात आयोडिन असते. त्यामुळे ही एक औषधी वनस्पती सुद्धा आहे.