दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुमारे 1,00,000 हून अधिक प्रकारच्या वनस्पती आहेत. यांतील काही वनस्पती स्वयंपोषी आहेत, तर काही वनस्पती परपोषी आहेत. ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात.
तर ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करु शकत नाहीत, त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात. या परपोषी वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात. Rafflesia ही अशीच परपोषी वनस्पती आहे. या वनस्पतीला लागणाऱ्या फुलाला प्रेताचे फूल असे म्हणतात. त्यांना अन्न तयार करण्यासाठी पाने किंवा देठ नसतात. हे फूल वेलींवर किंवा इतर वनस्पतींवर वाढते. त्याचा रंग लालभडक असतो.त्यावर काळे ठिपके असतात. त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पांढरा रंग असतो. ही फुले लांबून पाहिल्यानंतर मृत प्राण्यांच्या सुकलेल्या शरीरासारखी दिसतात. त्यांचा गंधही सडलेल्या मांसासारखा असतो. ही वनस्पती आग्नेय आशियातही आढळते. भरपूर पाऊस आणि दमट हवामान हे या वनस्पतीच्या वाढीस पोषक घटक आहेत. या फुलांचा दुर्गंध खूपच तीव्र असतो ,की तो दुर्गंध सहन होत नाही. हाच दुर्गध माश्यांना आणि कीटकांना आकर्षित करतो. त्यामुळे परागीभवन होण्यास मदत होते. रॅफ्लेसियाला मोठी फुले येतात. ही फुले साधारणतः तीन फूट रुंदीची असतात. सात वर्षाचे रोप झाले की त्याला फुले येतात.