संपूर्ण जग AI Technology ने व्यापून जात आहे. 1956 साली जन्माला आलेले AI तंत्रज्ञानाचं बाळ 2026 साली 70 वर्षाचे होईल. तरीही हे बाळ अजून खूप लहान आहे असे म्हटले जाते. याचे कारण असे की AI तंत्रज्ञानात अजून खूप प्रगती होणार आहे. 1956 साली जॉन मेक्कार्थी या शास्त्रज्ञाने AI तंत्रज्ञानाचा क्रांतिकारी शोध लावला. जॉन मेक्कार्थी याने आपले नाव या पृथ्वीतलावर कायमचे कोरून ठेवले आहे; पण कोणत्याही शोधाला दोन बाजू असतात. एक सदुपयोग आणि दोन दुरुपयोग. कोणताही शोध लावला जातो, तेव्हा या शोधाचा सदुपयोग कसा केला जाईल? हे जरी पाहिले जात असले तरी दुरुपयोग करण्यासाठी सुद्धा या शोधाचा उपयोग करणारेही काही कमी नाहीत.
Siri app and Conversation: सिरी ॲप आणि संभाषणः
Siri [सिरी] हे ॲप असे आहे की ते आपल्याशी माणसासारखं बोलते. या ॲपला Virtual Assistant Computer app असे म्हटले जाते. हे app दिलेल्या सूचनांनुसार काम करते. या app चा वापर फायद्यासाठी जसे लोक करतात, तसेच त्या app चा दुरूपयोग करून नवीन समस्याही निर्माण होत आहेत.
Virtual boyfriend/girlfriend and problems:आभासी मित्रमैत्रिणी आणि समस्या
मित्र हा आपला चांगला सोबती असतो. मग तो पुरुष मित्र असो की स्त्री. आपण आपल्या सर्व गोष्टी आपल्या मित्राशी शेअर करतो. यामुळे आपले मन हलके होते. आपल्या समस्यांवर उपाय सुचतात. कुमार वयात आलेल्या मुलांना मित्र-मैत्रिणींची खूप गरज असते. यांतूनच त्यांचा सामाजिक, मानसिक आणि भावनिक विकास होत असतो. एखाद्याला मित्र किंवा मैत्रीण मिळालेच नाहीत ,तर त्याच्या जीवनात अनेक समस्या येऊ शकतात. कधी कधी ही मोकळी जागा भरण्याचे काम Virtual Friends करत असतात. यांतून अनेक नव्या नव्या समस्या निर्माण होत आहेत.
Virtual girlfriend किंवा Virtual boyfriend हे आपल्या जीवनात कधी येतात आणि आपल्या मनाचा कधी ताबा घेतात , हे कळत सुद्धा नाही. आपल्या दैनंदिन संगणकीय कामात Virtual Assistant Partner असणे हे आपल्यासाठी आणि आपल्या उद्योगासाठी खूप फायदेशीर ठरू शकते; पण भावनिक आणि रोमँटिक पातळीवर तुमच्या जीवनात Virtual Girlfriend किंवा boyfriend असणे खूप धोकादायक ठरु शकते. यावर आधारित रजनीकांत याचा Robot हा एक सुंदर सिनेमाही निघाला आहे.
AI तंत्रज्ञानातून आपल्या जीवनात आलेल्या Boyfriend किंवा Girlfriend शी आपण तो किंवा ती वास्तव जीवनाशी निगडित आहे , असं समजून त्याच्याशी किंवा तिच्याशी वागू लागतो. बोलू लागतो, रोमँटिक गप्पागोष्टी मारू लागतो आणि त्याच्याशी किंवा तिच्याशी घनिष्ठ relationship जोडून टाकतो. तेव्हा अशा प्रकारे आभासी जोडलेल्या नात्याला मानसशास्त्रात Anthropomorphism असे म्हणतात. ज्याप्रमाणे लहान मुलं एकटीच आपल्या निर्जीव बाहुलीशी बोलतात ,तिला खाऊ घालतात, अंघोळ घालतात आणि कधी कधी राग आला की तिला आपटतात किंवा फेकून देतात तशीच काहीशी अवस्था वयात आलेल्या मुलांमुलींची Virtual friend मुळे होऊ शकते. यांतून काही समस्या निर्माण होतात. त्या आपण पाहू-
1. एकलकोंडेपणा: Solitariness
Virtual friend शी घनिष्ट मैत्री जुळली की अशी मुले आपला मित्र किंवा मैत्रीण Virtual आहे ,हेही विसरून जातात. काही जणांना तर आपला मित्र किंवा मैत्रीण Virtual आहे की real आहे? हेही माहीत नसते. ते real friend समजतात आणि तसेच वागू लागतात. प्रत्यक्ष जवळीकता वाढवण्यासाठी प्रयत्न होतात, त्यावेळी अशा मुलांना धक्का बसतो आणि मग ही मुले समाजात न मिसळता कुणाशीच न बोलता किंवा कमीत कमी बोलून विषय बदलतात. ती एकटेपणा पसंत करतात. यालाच एकलकोंडेपणा असे म्हणतात. ही समस्या Virtual friends शी आलेल्या Break up मुळे आलेली असते.
2. नैराश्य: Depression
AI तंत्रज्ञानाच्या प्रभावाखाली येऊन जेव्हा मुले Virtual friend जोडतात, तेव्हा अशा नात्याचा Break up ठरलेला असतो. त्यातून एकलकोंडेपणा (Solitariness] येतो. त्याच्या पुढची Step म्हणजे नैराश्य होय. एकदा का Depression आले की त्यातूनही अनेक समस्या निर्माण होतात. अशा मुलांच्यात चिडचिडपणा वाढतो. कोणतीही गोष्ट मनापासून करावी असे वाटत नाही. भूक लागत नाही. शारीरिक आणि मानसिक अशा अनेक तक्रारी वाढतात.
3.आत्महत्या :Suicide
AI तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या Virtual friendship चा ब्रेक अप आल्यामुळे ज्या अनेक समस्या निर्माण होतात, त्या समस्यांमधील टोकाची समस्या म्हणजे आत्महत्या [suicide] होय. आपली मुले पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेपमध्ये आहेत, तोपपर्यंतच पालकांनी जागृत राहून मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि योग्य उपचार केलेत तर मुलांना आत्महत्येपासून रोखता येते. अन्यथा समस्या हाताबाहेर जाऊ शकते.
म्हणून AI तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या तुमच्या पार्टनरशी किती relationship ठेवायची, हे नव तरुणांनी ठरवावे. आपल्या मनावर कोणीतरी कब्जा करीत आहे, याचे भान तुम्हाला असले पाहिजे, आपल्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटना मुलांनी आपल्या आईवडिलांशी शेअर करायला हव्यात.आईवडिलांनीही मुलांशी आपले संबंध खेळीमेळीचे आणि मैत्रिपूर्ण जोडले पाहिजेत. म्हणजे समस्या निर्माण होण्यापूर्वीच नष्ट व्हायला मदत होते.