Indian city of Bengaluru included in top 12 technology hubs in the world-जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हबमध्ये भारताचे बंगळुरू शहर समाविष्ट 

भारतातील बंगळुरू हे शहर स्वच्छता, नीटनेटकेपणा नियोजनबद्ध रचना, त्याचबरोबर सौंदर्य या गोष्टीसाठी पूर्वापार प्रसिद्ध आहेच; पण त्याचबरोबर आयटी सिटी म्हणून बंगळुरू हे शहर नावाजलेले आहे. आता या शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हब मध्ये समावेश झाला आहे. त्याची सविस्तर माहिती अशी—-

आय टी सिटी-बंगळुरू-IT city- Bangalore

संपूर्ण भारतभरच नव्हे, तर संपूर्ण जगभर बंगळुरू ही सिटी आयटी सिटी म्हणून नावाजलेली आहे. या शहराचा समावेश आंतरराष्ट्रीय पातळीवरील टेक्नॉलॉजी हब म्हणून झालेला असल्याने बंगळूर या शहराचे महत्त्व अधिकच वाढले आहे. सध्या या शहरात कार्यरत असलेल्या टेक कर्मचाऱ्यांची संख्या दहा लाखाहून अधिक आहे. असे रिअल इस्टेट सल्लागार सी बी आय च्या अहवालात म्हटले आहे.आता हे शहर टेक्नॉलॉजी हब म्हणून प्रसिद्ध आहे. जगातील टेक्नॉलॉजी पावर हाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारा शहरांमध्ये बंगळूर या शहराचा समावेश झालेला आहे. बंगळुरू हे शहर बीजिंग, शांघायसह आशिया- पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात मोठे तंत्रज्ञान कार्यबल असलेले शहर आहे. या शहरात दहा लाखाहून अधिक टेक कर्मचारी काम करत आहेत.

जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हब शहरे :top 12 technology hubs in the world

ग्लोबल टेक टॅलेंट गाईड बुक 2025 या अहवालात 115 जागतिक बाजारपेठांचे मूल्यांकन तंत्रज्ञान प्रतीनिधी यांनी केले आहे. सर्व शहरांची तंत्रज्ञान प्रतिभा, उपलब्धता, गुणवत्ता आणि खर्च यावर आधारित हे मूल्यांकन केलेले आहे. या शहरांची पावर हाऊस, सर्वश्रेष्ठता आणि उदयोन्मुख अशा श्रेणीमध्ये त्यांचे वर्गीकरण केले आहे. जगातील ही टॉप 12 शहरे पुढील प्रमाणे आहेत—-

1—बंगळूरू
2— बीजिंग
3—शांघाय
4—-बॉस्टन
5—-लंडन
6—-न्यूयॉर्क
7—–पॅरिस
8—–सॅन फ्रान्सिस्को
9—–सिएटल
10—सिंगापूर
11—टोकिओ
12—टोरॉंटो

बंगळुरू हे एआय उद्योजकांमध्येही अव्वल: Bangalore tops the list of AI entrepreneurs

भारतातील कर्नाटक राज्यात असलेले महत्त्वाचे शहर म्हणजे बंगळुरू होय. हे शहर एआय मधील नेतृत्वावर प्रकाश टाकण्यात आला तेव्हा असे लक्षात आले की भारतातील सर्वाधिक एआय उद्योजक हे बंगळुरूमध्ये आहेत. याबाबतीत फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क सारख्या अमेरिकन केंद्राच्या बरोबरीने या शहरात ए आय तंत्रज्ञानाचे काम चालू आहे. भारतासाठी ही गोष्ट अभिमानास्पद अशीच आहे.

Leave a comment