Administrative system in Maharashtra: महाराष्ट्रातील प्रशासन यंत्रणा

१) महाराष्ट्रातील प्रशासन :

* महाराष्ट्राचे मंत्रालय: महाराष्ट्रातील सर्वोच्च पातळीवरील राज्यकारभार ‘मुंबई’ येथील मंत्रालयातून चालतो.

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ :

विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाचे मंत्रिमंडळ बनते. हे मंत्रिमंडळ महाराष्ट्र राज्याचा राज्यकारभार करते. मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात.

* प्रशासकीय विभाग राज्यकारभाराच्या सोयीसाठी 37 विभाग पाडले आहेत. प्रत्येक विभागासाठी एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो.

* मुख्य सचिव :

महाराष्ट्र शासनातील सर्वोच्च सनदी अधिकाऱ्यास ‘मुख्य सचिव’ म्हणतात. हा सचिव भारतीय प्रशासन सेवेतील असतो.

प्रधान सचिव :

प्रत्येक खात्याच्या प्रमुखपदी असणाऱ्या ज्येष्ठ सचिवास ‘प्रधान सचिव’ म्हणतात.

* मुख्य माहिती आयुक्त:

केंद्रीय माहितीचा अधिकार कायद्यान्वये महाराष्ट्रात 2005 पासून ‘मुख्य माहिती आयुक्त’ या अधिकाऱ्याची निर्मिती झाली.

२) जिल्हा कारभार :

प्रशासकीय विभाग :

* राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्याचे सहा प्रशासकीय विभाग पाडले आहेत.

* प्रशासकीय विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यास ‘आयुक्त’ म्हणतात.

जिल्ह्यातील अधिकारी :

* जिल्ह्याच्या प्रमुखपदी ‘जिल्हाधिकारी’ असतात. त्यांच्या अखत्यारीत इतर अधिकारी (उदा. तहसीलदार) असतात.

जिल्हा परिषदा, महानगरपालिका यांचा कारभार त्या त्या प्रमुखांच्या देखरेखीखाली चालतो. (उदा. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी).

३) पोलीस यंत्रणा :

* पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक हे राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी असतात.

पोलीस आयुक्त :

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ‘पोलीस आयुक्त’ हे सर्वोच्च अधिकारी असतात.

* जिल्हा पोलीसप्रमुख :

जिल्हा पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक (DSP) असतो.

याशिवाय –

* महिला पोलीस

* राज्य राखीव पोलीस

* होमगार्ड टीम

* फोर्स वन

* तुरुंगात

* कारागृह

इत्यादी घटक पोलीस यंत्रणेशी संबंधित आहेत.

Leave a comment