अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर केलेल्या लष्करी कारवाईनंतर त्यांचा आत्मविश्वास भलताच वाढलेला आहे. त्यामुळे त्यांनी अनेक देशांवर दबाव टाकण्याचे तंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. आता व्हेनेझुएलानंतर इराणवर त्यांचे विशेष लक्ष असून इराणवर दबाव वाढत असल्याचे दिसत आहे. याचे काय परिणाम होतील ते आपण सविस्तर पाहू.
व्हेनेझुएलावर पूर्ण कब्जा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी कारवाई करून व्हेनेझुएला या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनाच अटक करून अमेरिकेत तुरुंगात डांबून ठेवले आहे आणि संपूर्ण व्हेनेझुएलाचा कारभार अमेरिका अर्थात डोनाल्ड ट्रम्प पाहत आहेत.या व्हेनेजुएलाच्या कारवाईनंतर ट्रम्पचा विश्वास वाढत चालला आहे. त्यानंतर आता त्यांनी इराणवर लक्ष केंद्रित केले आहे.
इराण अमेरिका तणाव वाढला
इराणला अमेरिका नेहमीच लष्करी कारवाईची आणि टॅरिफची धमकी देत आहे .अर्थात आतापर्यंत इराण अमेरिकेला त्यांच्या दबावाला बळी पडलेला नाही. असे असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वभाव पाहता ते इराणवर लष्करी कारवाई करू शकतात आणि युद्ध पेटू शकते. या युद्धाचा परिणाम काहीही असला तरी अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना त्याचा फटका बसणार आहे.याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे.
अमेरिकेचा टॅरिफचा वाढता दबाव
अमेरिकेने भारत ,चीन, रशिया या देशांवर डायरेक्ट टॅरिफ वाढवल्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था बिघडू शकते हे अमेरिकेच्या लक्षात आल्यानंतर जगातील इतर देशांनाही अमेरिका टॅरिफची धमकी देऊ लागलेली आहे. अर्थात या एकतर्फी टॅरिफमुळे केवळ इतर देशांचे नुकसान होणार नाही, तर या गोष्टीमुळे अमेरिकेचेही अर्थव्यवस्था बिघडली जाणार आहे; पण डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या हट्टी आणि दुराग्रही माणसाला हे कोण समजून सांगणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिका फर्स्ट हे धोरण नक्कीच अमेरिकेला संकटात आणणार आहे , हे भविष्यात लवकरच दिसून येईल.