28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ निर्माण झाली होती. त्यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्यामध्ये प्रचंड पोकळी निर्माण झाली होती. अजित पवार यांचे अंत्यविधी आणि रक्षाविसर्जन विधी पार पाडल्यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर अनेक खलबते झाली. या खलबत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ,छगन भुजबळ आदी मंडळींनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक होण्यासाठी चक्रव्यूह आखला. त्यानुसार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार या आज सायंकाळी म्हणजे 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता शपथविधी पार कडून महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सन्मान मिळवला.
*राष्ट्रवादी विलीनीकरण लांबणीवर*
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांना दोन्ही राष्ट्रवादी एक येऊ नयेत असे वाटत होते. आणि त्यानुसारच ते अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर काम करत होते. दोन्ही राष्ट्रवादी एक झाले तर शरद पवार यांची ताकद पुन्हा वाढेल आणि आपल्याला ते कधीही अडचणीत आणू शकतील. असे भाजपाला वाटत होते त्यामुळेच त्यांनी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांना हाताशी धरून सुनेत्रा पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ घातली आणि राष्ट्रवादीला कमकुवत करण्याचे काम भाजपाने केले. या घडामोडीतून एकच चांगले घडले ते म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून पवार घराण्यातील सुनेत्रा पवार या झाल्या. हे जरी सत्य असले तरी पवार घराण्याचे यामध्ये मोठे नुकसानच आहे. सुनेत्रा पवार या पक्या राजकारणी नाहीत आणि त्याचा फायदा अजित पवार गटातील नेते मंडळी घेणार आणि राष्ट्रवादीचा गट आपल्या ताब्यात घेणार असे असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता या टोळक्याच्या मागे जाणार नाही. या सर्वांचा परिणाम राष्ट्रवादी कमकुवत होण्यासच कारणीभूत ठरणार. दोन्ही राष्ट्रवादी एक झाले असते तर राष्ट्रवादीची महाराष्ट्रात ताकद निर्माण झाली असती.