Iran Hormuz blockade news-नाकेबंदी हटवा, होर्मुझ खुली करू:इराणची अट

इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यात शस्त्र संधी झालेली असली तरी अंतर्गत धुसफूस आणि वाद सुरूच आहेत. होर्मुझवर कुणाचे वर्चस्व? यावरून सध्या हे वाद सुरू आहेत. अमेरिकेला इराणचे होर्मुझवरील वर्चस्व मान्य नाही. त्यामुळेच अमेरिकेने सध्या होर्मुझ सामुद्रीधुनीत नाकेबंदी केलेली आहे. आणि इराणचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर इराणने असे म्हटले आहे की तुम्ही होर्मुझवरील नाकेबंदी पूर्ण हटवा मग आम्ही होर्मुझ खुली करू असाही इराणला सल्ला दिला आहे आणि अट घातली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव कमी करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी हिराणशी चर्चा केली आहे; पण ही चर्चा माध्यमांपर्यंत येणार नाही याची काळजी इराण आणि रशियाने घेतली आहे. इराण- अमेरिका युद्धात इराणची हार झाली नसली तरी अमेरिका आणि इस्राईलला दोन पावले मागे यावे लागले आहे. हे जरी खरे असले तरी या युद्धात मोठ्या प्रमाणात इराणचे नुकसान झालेले आहे. त्याचा राग इराणला आहे. त्यामुळेच इराणचा होर्मुझ सामुद्रधुनीत टोल लावण्याचा इरादा आहे; पण हे अमेरिकेला मान्य नाही. त्यातूनच हा संघर्ष होत आहे आणि अधून मधून खटके होत आहेत . युद्ध विरामला पूर्णत्व येण्यास वेळ लागत आहे.

Leave a comment