Shivaji Maharaj book discussion-शिवाजी कोण होता: पुस्तक पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील सत्यकथा सांगणारे पुस्तक म्हणजे शिवाजी कोण होता. हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहिले असून 1988 साली प्रकाशित झालेले आहे. या 78 पाणी पुस्तकात शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलू अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत गोविंद पानसरे यांनी उलगडून दाखवले आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकावरून सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. काहीना हे पुस्तक समजलेच नाही. त्यामुळे पुस्तकाच्या शीर्षकावरून अनेकांनी लेखकावर आणि प्रकाशकावर राग काढला आहे. असेच एक कमी शिकलेले आणि इतिहासाचे जाण नसणारे महाराष्ट्रातील एक आमदार यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून वाटेल तशा शिव्या शाप देऊन उद्धार केला. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद करून सुद्धा या सरकारने घेतला नाही आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले. एका दिवसात या पुस्तकाच्या दहा हजार प्रति संपल्या. पुस्तकांच्या मागणीचा ओघ वाढतच आहे. पुस्तक छोटेसेच आहे; पण गोविंद पानसरे यांनी अतिशय सुंदर मांडणी केली आहे. शिवाजी महाराज हे केवळ कोणत्याही धर्माचे प्रतिनिधी नसून त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रामाणिक लोकांना हाताशी धरून राज्य उभारले. तेच गोविंद पानसरे यांनी आपल्या पुस्तकात सांगितले आहे.

शिवकाळात हिंदू मुस्लिम असा भेदभाव नव्हता. काही मराठी सरदार विजापूरच्या आदिलशहाकडे, अहमदनगरच्या निजामशहाकडे चाकरी करत असत,तर काही मुस्लिम सरदार शिवरायांकडे चाकरी करत असत. काही हिंदू सरदार औरंगजेबकडे सरदार म्हणून चाकरी करत असत. या सर्व गोष्टी पाहिल्या तर असे लक्षात येते की तत्कालीन कोणतीही राजवट धर्मावर आधारित नव्हती. शिवरायांचे हेच तत्त्व होते. या सर्व राजवटीमध्ये शिवराय आणि स्वराज्य यामध्ये फरक आहे. शिवरायांना रयतेचे राज्य निर्माण करायचे होते आणि त्यांनी ते केले. त्यांना स्वतः हुकूमशहा व्हायचे नव्हते. हे आणखी एक त्यांचे वैशिष्ट्य होते. या सर्व बाबी गोविंद पानसरे यांनी आपल्या पुस्तकात मांडलेले आहेत.

पुस्तकाची भाषा आणि वाद

शिवाजी कोण होता या शीर्षकावरूनच अनेकांना पुस्तकाचे शीर्षक खटकले. लेखकाने पुस्तकात सुद्धा शिवाजी असाच उल्लेख केला आहे. एकेरी भाषा वापरली आहे. इतिहासाची जाण असणाऱ्या वाचकाला या गोष्टी माहिती आहेत.कोणत्याही महान पुरुषाला दैवत प्राप्त करून देणे म्हणजे त्यांचा तो अपमान असतो. त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान असतो. त्यांच्याकडे तुम्ही माणूस म्हणून पाहिले पाहिजे आणि माणूस म्हणून मूल्यमापन केले पाहिजे. हा इतिहासकारांचा आणि ऐतिहासिक संशोधकांचा रिवाज आहे. त्याप्रमाणे ती भाषा वापरलेली आहे. पण जे काहीच वाचत नाहीत किंवा तुटपुंजे ज्ञान यांच्याकडे आहे त्यांना यातलं काय कळणार आहे.म्हणूनच पुस्तकाचा शीर्षक आणि पुस्तकातील भाषा यावर जो वाद निर्माण झाला आहे तो निरर्थक आहे निरर्थक आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुस्तकाचे वाचन आणि वादही

शिवसेनेचे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिव्या दिल्यानंतर महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आणि पुरोगामी विचाराच्या अनेक कार्यकर्त्यांनी पुस्तकाचे सामूहिक वाचन केले. अनेक ठिकाणी प्रकट वाचन केले. काही ठिकाणी विरोधही झाला. हा विरोध धर्मांधतेचा विरोध होता. ज्यांना शिवाजी महाराज समजलेच नाहीत आणि ज्यांना धार्मिक तेढ निर्माण करायचे आहे , असे लोक विरोध करत होते. सरकारनेही खतपाणी घातले. ही बाब दुर्दैवाची आहे.

Leave a comment