होर्मुझच्या सामुद्रीधुनीत आजही कोंडी चालूच आहे. सामुद्रधुनी अशीच बंद राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसणार आहे. कच्च्या तेलाचे दर 200 डॉलरवर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे प्रचंड महागाई निर्माण होईल. तेलाचे दर भडकतील.
अमेरिका-इराण- इस्रायल युद्ध काही काळासाठी थांबले असले तरी होर्मुझच्या सामुद्रध्वनीतील प्रश्न अजून सुटलेले नाहीत.होर्मुझवर इराणचा वचक राहू नये यासाठी अमेरिका धडपड करत आहे. इराण कोणत्याही परिस्थितीत तेलाच्या जहाजांवर टोल लावू नये यासाठी अमेरिकेची धडपड आहे. अर्थात इराणची यामध्ये कोंडी व्हावी आणि इराण आर्थिक संकटात यावा हा अमेरिकेचा म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांचा मुख्य हेतू आहे. इराणला असे वाटते की आमचे झालेले नुकसान टोलच्या रूपाने आम्ही भरून काढू. यातूनच होर्मुझवरील दिवसेंदिवस कोंडी वाढत आहे. ही कोंडी अशीच काही दिवस राहिली, तर जागतिक मंदी यायला वेळ लागणार नाही.सतत कोसळत असलेला शेअर बाजार आणखी कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.