उन्हाळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणात फळांची आवक वाढलेली असते. विशेषतः कलिंगडचे प्रमाण हे वाढलेले असते. उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची फळे खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते; पण फळे खाताना योग्य ती काळजी आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
25 एप्रिल 2026 रोजी मुंबई मधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू जेवणानंतर कलिंगड खाल्ल्याने झाला. या कुटुंबातील चारही जणांना अतिसार आणि उलट्या झाल्यानंतर मुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. रात्रीच्या जेवणानंतर या कुटुंबाने कलिंगड खाल्ले होते. शवविच्छेदन अहवालात विषबाधेची पुष्टी झाली आहे. अशा घटना विशेषतः उन्हाळ्यात अधिक प्रमाणात घडतात.उष्ण हवामानात मोठ्या प्रमाणात विषाणूंची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे फुड पॉयझनिंगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. म्हणूनच उन्हाळ्यात योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
फळे खा; पण काळजी घेऊन
उन्हाळ्यात फळे खाणे आवश्यक आहे; पण सावधगिरी बाळगणे हे आवश्यक आहे. कापून ठेवलेली फळे, फ्रिजमध्ये ठेवलेली फळे खाल्ल्याने विषाणूंची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे धोका अधिक निर्माण होतो.म्हणून फळे खाताना काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः सकाळच्या वेळी फळे खाणे ही योग्य वेळ मांडली जाते. कलिंगड अधिक प्रमाणात गोड लागत असेल आणि त्याचा रंग अधिक प्रमाणात लालसर दिसत असेल तर समजावे की कलिंगडला लाल रंग येण्यासाठी कृत्रिम रंग वापरलेला आहे.असे कलिंगड खाऊ नये.