SSC Result 2026 Maharashtra-2025/26 चा दहावीचा निकाल जाहीर: मराठीचा टक्का घसरला

2025 या शैक्षणिक वर्षात त्यांनी दहावी पूर्ण केली, त्या दहावीचा निकाल 2026 रोजी जाहीर झाला असून राज्यात दहावीचा निकाल 92 टक्के लागला आहे.यामध्ये मराठीचा टक्का घसरल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रातील एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे 94 हजार विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत. मराठी आणि इंग्रजी या विषयांची तुलना केल्यास इंग्रजीचा निकाल चांगला लागलेला आहे. त्या खालोखाल मराठीचा निकाल लागला आहे, तर त्या खालोखाल हिंदीचा निकाल लागलेला आहे.

मुले मराठी विषयात नापास का होतात?

मुळात करिअर घडवण्यासाठी मराठीचा खूप उपयोग होत असतो. पण मुलांना हेच कळत नाही. मुलांना वाटते करिअर करण्यासाठी मराठीचा फारसा काही उपयोग नाही.त्यामुळेच मुले मराठीचा गांभीर्याने अभ्यास करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मराठीचे शुद्धलेखन आणि शुद्धलेखनातील चुका, अवांतर वाचनाचा अभाव, यामुळेही मुले मराठीत नापास होत आहे. सुरुवातीपासूनच शिक्षक गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांवर भर देतात तेच मुलांच्या बाबतीतही घडते.त्यामुळे मराठी विषयाकडे दुर्लक्ष होते आणि मुलांचे नापासीचे प्रमाण वाढते. आपण मराठी विषय शिकतो याचा अभिमान खूप कमी आहे. ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. मराठीबद्दल सखोल ज्ञान मिळवण्याची मुलांची इच्छाशक्ती पण कमी आहे. त्यामुळे मुलांचे मराठी विषयातील नापासीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

Leave a comment