India inflation news 2026-महागाईने गाठला गेल्या साडेतीन वर्षातील उच्चांक

आखाती देशातील युद्धजन्य परिषदेमुळे तणाव कायम आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे. विशेष म्हणजे जे इराणचे शत्रू नाहीत अशा देशांना फारसा फटका बसत असल्याचे दिसत नाही. भारताने अमेरिकेशी मैत्री करून इराणसी विनाकारण वैर घेतले. त्यामुळे इराण भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देण्यास नाकारत आहे. आणि म्हणूनच भारतात महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. गेल्या साडेतीन वर्षात आठ टक्क्यांनी महागाई वाढलेली आहे.

गेल्या 42 महिन्यातील महागाईचा दर पाहिला तर जवळजवळ 8.3 टक्क्यांनी महागाई वाढलेली दिसत आहे. एप्रिल 2025 मध्ये महागाई 0.85% होती.जून 2025 मध्ये -0.19% होती. ऑगस्ट 2025 मध्ये ०.५२ टक्के महागाई होती. तर ऑक्टोबर 2025 मध्ये -1.02% होती. डिसेंबर 2025 मध्ये 0. 96% महागाई होती. फेब्रुवारी 2026 मध्ये 2. 26% वर महागाई गेली. एप्रिल 2026 मध्ये हीच माघारी 8.30 टक्क्यांवर गेलेली आहे. आत्तापर्यंत कधीही महागाई इतकी वाढली नव्हती. महागाईचा दर सध्या वाढत चाललेला आहे याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोसळत आणि ढासळत असल्याचे चित्र दिसत आहे. याचा परिणाम वाहतुकीशी संबंधित असलेल्या सर्व मालावर होणार असून त्यांचे दर वाढणार आहेत.

Leave a comment