Impact of Wrong Foreign Policy-देशात महागाईचा भडका; चुकीच्या परराष्ट्र धोरणाचा फटका

आखाती देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी अद्याप पूर्णतः खुली न झाल्याने भारताला तेल पुरवठा वेळेवर होईनासा झाला आहे. त्याचबरोबर चढ्या दराने डॉलरच्या किमतीत तेल खरेदी करावे लागते. रुपयाची घसरण चालूच असल्यामुळे तेलाचा भाव वाढला आहे. संपूर्ण भारतात प्रत्येकी तीन रुपये प्रमाणे डिझेल आणि पेट्रोलचा दर वाढवला आहे. त्याचा परिणाम इतका भयानक झाला आहे की देशात महागाईचा भडका उडाला आहे. अगदी भाजीपाल्यापासून ते बांधकाम साहित्यापर्यंत सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. भारतातील अर्थतज्ज्ञ आणि राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार भारताचे परराष्ट्रीय धोरण पूर्णतः चुकीचे ठरले आहे आणि त्याचाच परिणाम आज भारत देश भोगत आहे.

इराणशी पंगा भारताला महाग पडला

अमेरिका-इराण- इस्रायल युद्धात भारताची भूमिका पूर्णतः चुकली असून भारताने या युद्धामध्ये इराणला तोडले असल्यामुळे आणि अमेरिकेला सांभाळण्याच्या प्रयत्नामुळे भारतालाही आज झळ बसत आहे. केवळ अदानीला वाचवण्यासाठी आणि एपस्टीन फाईलच्या भीतीमुळे भारताने अमेरिकेशी चुकीचा करार केला. रशियाकडून तेल विकत घेऊ नका अशी अमेरिकेने धमकी दिली आणि भारताने त्याचे पालन केले त्याचबरोबर डॉलरच्या किमतीत तेल विकत घ्या असा अमेरिकेने दम दिला आणि भारताने ते मान्य केले. इराणचे राष्ट्राध्यक्ष खामनेई यांचा मृत्यू होऊनही साधा निषेधही भारताचे पंतप्रधान किंवा अन्य कोणीही केला नाही.याचा परिणाम इराणने भारताला स्वस्त दरात तेल देण्याचे नाकारले आणि गरजेपेक्षा कमी तेल मिळेल असे सांगितले. इराणशी पंगा घेतल्यामुळे भारत आता मोठ्या अडचणीत आलेला आहे. नजीकच्या काळात पेट्रोलचा दर 120 ते 30 रुपयापर्यंत जाईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Leave a comment