Cockroach Janata Party-कॉक्रोच जनता पार्टी जोमात सरकार कोमात

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवक आणि झुरळ यांच्या संबंधित वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सरन्यायाधीश चांगले स्ट्रोल झाले. त्यातूनच तरुणांनी एक्सवर कॉक्रोच जनता पार्टी नावाचे अकाउंट काढले आणि या पार्टीने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून सरकारवर प्रचंड टीका होत आहे .अखेर 16 मे रोजी सुरू झालेले एक्स वरील कॉक्रोच जनता पार्टीचे अकाउंट गुरुवारी ब्लॉक करण्यात आले. मात्र काही वेळातच कॉक्रोच बॅक नावाने नवीन हँडल सुरू करून कॅम्पेन सुरू करण्यात आले. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सांगितले की बुधवारपासून एक हाती हॅक करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ही कारवाई अपेक्षितच होती. आता कॉक्रोच इज बॅक या नावाने नवीन एक्स खाते सुरू केल्याची माहिती यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली. काॅक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स इतक्या झपाट्याने वाढले की सरकारला घाम फुटला आणि अकाउंट सस्पेंड करण्याची वेळ त्यांच्यावर आली. सरकारची ही दडपशाही एक दिवस देशातील तरुणच जुगारून लावतील आणि त्याचा प्रचंड विस्फोट होऊन सरकारला सळो की फळ करून सोडतील असे वाटते.

कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टा अकाउंट कायम

कॉक्रोच जनता पार्टीने एक्स वर आणि इंस्टाग्रामवर अकाउंट काढले होते. इंस्टाग्रामवर तर कॉक्रोच जनता पार्टीने कहरच केला. सर्वच राजकीय पक्षांना कॉक्रोच जनता पार्टीच्या फॉलोर्सनी मागे टाकले आहे. सध्या कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स एक कोटी 93 लाख इतके आहेत. तर काँग्रेसचे फॉलोअर्स एक कोटी 33 लाख असून भाजपाचे 88 लाख फॉलोअर्स आहेत.

सांगण्याचे तात्पर्य हेच की तरुणांना एक तर नोकरी मिळत नाही. उद्योग धंदा करण्यासाठी पुरेसे अर्थसाह्य मिळत नाही. अशी अवस्था असताना त्याच तरुणांच्या जखमांवर मीठ चोळल्यानंतर काय परिणाम होतात. याची प्रचिती या प्रसंगाने नक्कीच आली.

Leave a comment