Heatwave Lockdown Situation-उष्माघाताच्या भीतीमुळे सकाळी दहा वाजताच लाॅकडाऊनची स्थिती.

ग्लोबल वार्मिंग आणि भारतात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड या कारणांमुळे देशात अनेक ठिकाणी प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तर उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात दुपारी लॉकडाऊन सदृश स्थिती निर्माण होणे हे काही नवे नाही; पण सकाळी दहा वाजता चक्क शहर ओस पडत असेल तर उष्णतेच्या दाहकतेची कल्पना न केलेलीच बरी! राजस्थानच्या सुरू आणि जैसलमेरला मागे टाकत उत्तर प्रदेशातील बांदा जिल्हा आता देशातील नवे हिट आयलँड ठरला आहे. मे महिन्याच्या मध्यातच येथील तापमान 48.2°c वर पोहोचल्याने उष्माघाताच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. सकाळी दहा नंतर बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरत असून अघोषित लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत आहे.

बांदा जिल्हा अचानक का तापला

उत्तर प्रदेशातील बांधा जिल्ह्यात कधी नव्हे इतके तापमान नोंदले गेल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका संशोधन अहवालानुसार गेल्या काही दशकात बांधा जिल्ह्याने आपल्या घनदाट वनक्षेत्राचा सुमारे 16 टक्के भाग गमावला आहे.विंध्य पर्वतरांगांमधील तब्बल 25% डोंगर बेकायदेशीर उत्खनन आणि प्रचंड स्फोटामुळे नष्ट झाले आहेत. येथील डोंगर हे पाणी शोषून भूजल पातळी वाढवण्याचे काम करायचे. मात्र खाणकामामुळे ही नैसर्गिक रचनाच उध्वस्त झाली आहे. अर्थात हे खान काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारी यांच्या संगनमताने अदानी कंपनीला दिलेले असणाऱ .यांत शंका घेण्यास जागा नाही. भारतात अशा अनेक ठिकाणी जंगलतोड करून खाणकाम सुरू असल्याने केंद्र सरकारच्या या निगरगट्ट धोरणामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. प्रचंड उष्णतेने लोक हैराण होत आहेत. वृक्ष लागवड तर केली जात नाहीत; पण वृक्षतोड मात्र देशात मोठ्या प्रमाणात होत आहे. वृक्ष लागवड ही आपल्या देशात फक्त कागदावरच केली जाते. त्यासाठी भरपूर अनुदान दिले जाते. पण वृक्ष संवर्धन होत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर भारतात प्रचंड तापमान वाढलेले चित्र दिसत आहे. भविष्यात दुबई सारखी स्थिती निर्माण होईल. या दुबईत उन्हाळ्यात 55°c पर्यंत तापमान असते. ती वेळ भारतात यायला वेळ लागणार नाही.

Leave a comment