El Nino and Agriculture-चालू वर्षीचा खरीप हंगाम अल निनो मुळे धोक्यात

खतांच्या भरमसाठ किमती वाढल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. खरीप हंगाम करण्यासाठी शेतकऱ्यांना चढ्या दरातील खत घ्यावे लागणार आहे. पिकांना मिळणारा भाव आणि खतांचे भाव याची तुलना करता शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तरीसुद्धा सरकारने खतांचे दर वाढवून शेतकऱ्यांच्या मानेवर सुरी ठेवली आहे. ही परिस्थिती असताना यंदाच्या खरीप हंगामावर आणखी एक गंभीर सावट येत आहे. आणि ते सावट म्हणजे अल निनोचे होय. यावर्षी पाऊस दरवर्षीच्या तुलनेत कमी पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. शिवाय यंदाचा मोसमी पाऊस पुढे ढकलण्याची भीतीही निर्माण झाली आहे.

पावसाच्या लहरीपणाचा परिणाम पिकांवर होणार असून पिकांचे उत्पन्नही घटणार आहे किंवा खरीप हंगामच धोक्यात आला आहे. शेतकऱ्याने बी बियाणे पेरल्यानंतर पाऊस वेळेवर लागला नाही तर बी बियाणे खराब होण्याची शक्यता आहे. बी बियाण्यांची उगवण वेळेवर झाली नाही आणि उगवण झाल्यानंतर अचानक पावसाने उघडीत केली तरीही शेतकऱ्यांचे पीक धोक्यात येणार आहे.अर्थात या सर्वांची झळ शेवटी शेतकऱ्यांनाच बसणार आहे.

Leave a comment