Trump halts attacks on Iran-इराणवरील हल्ले थांबवले : ट्रम्प

शस्त्रसंधी असतानाही अमेरिकेने दोन दिवसांपूर्वी इराणवर अचानक हल्ले केले. इराणनेही चोख प्रत्युत्तर दिले; पण ट्रम्प यांनी आता पुन्हा घोषणा केली आहे की इराणवरील हल्ले थांबवलेले आहेत. उच्च स्तरीय चर्चेनंतर जाहीर केलेला हा निर्णय आहे. अमेरिका – इस्रायलसह अनेक देशांमध्ये कराराच्या अंतिम टप्प्यावर चर्चा झाली आहे. इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची मंजुरीही मिळाली आहे. युद्ध समाप्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल जात उचलले आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

इराणबाबत सुरू असलेल्या चर्चांना इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची मंजुरी मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री नियोजित हवाई हल्ले आणि बॉंब हल्ले रद्द केल्याची घोषणा केली. संबंधित सर्व पक्षांमध्ये कराराच्या प्रमुख मुद्द्यांवर सहमती झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे; पण ट्रम्प यांच्यावर जागतिक स्तरावर कोणाचाही विश्वास नाही हेही सत्य आहे. ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवरील निवेदनात सांगितले की इराणसी संबंधित चर्चा सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या असून त्यांना मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे अमेरिकेकडून नियोजित लष्करी कारवाई स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

इराणवरील लष्करी हल्ले रद्द करण्यात आले असले तरी इराणविरोधात नौदल नाकेबंदी कायम ठेवण्यात येणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. प्रस्तावित व्यवहार आणि करार अंतिम होईपर्यंत ही नाकेबंदी पूर्ण क्षमतेने सुरू राहील असेही त्यांनी म्हटले.

Leave a comment