Trinamool Congress internal conflict-तृणमूल काँग्रेसमधील वाद विकोपाला गेला. राजीनामा सत्र चालूच

पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतर वाद सुरू झाला आणि हा वाद विकोपाला जाऊन काही खासदारांनी वेगळा गट निर्माण केला आणि या वेगळ्या गटाला परवानगी देण्यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्ष यांना पत्रही दिले आहे.

पश्चिमबंगालमधील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीचे संकट अधिकच गडद झाले आहे. गुरुवारी पक्षाचे राज्यसभा खासदार प्रकाश बराई यांनी खासदारकी आणि पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे ममता बॅनर्जी यांना या आठवड्यात तिसरा मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे पक्षांतर्गत वादाला नवे तोंड फुटले असून ज्येष्ठ नेते कल्याण बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात थेट बंड पुकारले आहे. या सर्व राजकीय भूत भूकंपादरम्यान शत्रुघ्न सिन्हा, स्वागत रॉय आणि बाबुल सुप्रिया यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आपण दीदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे जाहीर केले आहे.

Leave a comment