Mexico FIFA World Cup 2026-फिफा वर्ल्डकप मध्ये यजमान मेक्सिकोची धडाकेबाज सुरुवात

12 जून 2026 पासून सुरू झालेला फिफा वर्ल्डकपमध्ये यजमान मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेवर 2-0 अशी मात करून आपली धडाकेबाज सुरुवात केली.

फिफा वर्ल्डकपमध्ये मेक्सिकोला सहयजमानपद आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फुटबॉल विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव करून आपल्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली आहे.यंदाच्या विश्वचषकात विक्रमी 48 संघ सहभागी होत असून खचाखच भरलेल्या ॲझतेका स्टेडियमवर यजमान मेक्सिकोच्या संघावर चाहत्यांच्या अपेक्षांचे मोठे दडपण असणे साहजिकच होते. मात्र खेळाडूंनी आपली भूमिका चोख बजावत दक्षिण आफ्रिकेवर सहज विजय मिळवला आणि आपल्या चाहत्यांना जल्लोष करण्याची मोठी संधी दिली.

दक्षिण कोरिया चा झेक प्रजासत्ताकवर विजय

फिफा वर्ल्डकपमधील दुसऱ्या एका सामन्यात पिछाडीवर असलेल्या दक्षिण कोरियाने झेक प्रज्ञासत्ताकवर मात करत दोन- एकने पराभव करून विजय प्राप्त केला.सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती; पण सुरुवातीलाच झेक प्रजासत्ताकने गोल केला त्यानंतर दुसऱ्या सत्रात पूर्णतः दक्षिण कोरियाने वर्चस्व राखत दोन गोल करून विजयाची मोहर उठवली.

Leave a comment