एफ डी ए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध क्षेत्रातील माफीयांना चांगलाच दणका दिला आहे. दुधातील भेसळ चव्हाट्यावर आणून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उघडला आहे. पतंजली मार्फत विकल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक औषधांवर निर्बंध लावून ती औषधे चुकीची कशी आहेत हे जनतेला पटवून दिले आहे. लोकांच्या शरीराशी आणि भावनाशी खेळण्याचा कोणत्याही कंपनीला किंवा माफीयांना अधिकार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. आता त्यांचा मोर्चा गुटखा माफियांच्या दिशेने वळला असून महाराष्ट्रातील गुटखा माफीयांच्या मुसक्या आवळणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी आदेश दिले आहेत. अवैध गुटखा विक्रेत्यांवर थेट मकोका लावणार असेही ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे गुटका माफीयांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.
तिकडे सरकार अनेक अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करत आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव आयएएस अधिकारी एकतर्फी लढत आहेत. हे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील सर्वच अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी, आयुक्तांनी, सचिवांनी जर तुकाराम मुंढे यांच्यासारखी भूमिका घेतली तर महाराष्ट्र स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त होईल आणि महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास होईल.पण या राजकीय नेत्यांची मात्र खूप अडचण होईल. यांनाच मुळात भ्रष्टाचार हवा असतो. त्यामुळे असे अवैध धंदे खपवून घेतले जातात.