12 जून पासून सुरू झालेल्या फिफा वर्ल्ड कप मध्ये अमेरिकेने आपल्या पहिल्याच सामन्यात पॅराग्वेवर 4 – 1 ने मात करून आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवलेला आहे. अमेरिका आणि फुटबॉल यांचे नाते फारसे नसले तरी ऑलिंपिकमध्ये अमेरिकेची कामगिरी वाखाणण्यासारखी असते. आता अमेरिकेने फुटबॉल खेळातही चांगले लक्ष लागल्याचे या विजयाने लक्षात येते. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या आणि लंडनमध्ये वाढलेल्या स्ट्रायकर बालोगुनने विश्वचषकात पदार्पण करताना 1930 नंतर या स्पर्धेत एकाच समन्यात एकापेक्षा जास्त गोल करण्याचा पराक्रम केला. बालोगुनाने इंग्लंड कडून खेळण्याऐवजी तीन वर्षांपूर्वी अमेरिकेचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला होता. हॉलिवूड पासून दहा मैलाच्या अंतरावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आनंद घेण्यासाठी टॉम क्रूज, जॉर्ज लुकास, बिल गेट्स, हालेबेरी, लिओनार्दी डिकॅप्रियो आणि करीम अब्दुल जबार असे अनेक दिग्गज उपस्थित होते.