Abhishek Banerjee house raid-अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर मध्यरात्री छापे:चार तास तपासणी

संसदेत भारतीय जनता पक्षाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाम फोडणारे तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकात्यातील कालीघाट येथील निवासस्थानी पश्चिम बंगाल पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाने शनिवारी छापे टाकले. हे छापे म्हणजे राजकीय सूड आहेत, असा तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये तृणमल काँग्रेसचा पराभव झाला. हा पराभव ईव्हीएमने केला की लोकशाही मार्गाने केला हे सर्व जनतेला माहित आहे. विरोधी पक्षाचे पूर्ण कंबरडे मोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा लावून विरोधी पक्षाला हतबल करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने संपूर्ण भारतभर केले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हा मजबूत पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता येताच तृणमूल काँग्रेसला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचा डाव भारतीय जनता पक्षाने आखला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर छापे टाकून तपासणी करण्याचे काम केले आहे.

Leave a comment