आपल्याला पुरेसा आराम मिळाला नाही तर थकवा येतो; पण भरपूर आराम करूनही अंगातील थकवा जात नाही. तोंडातून दुर्गंधी येते. अशक्तपणा जाणवतो. चक्कर येते. हातपाय बधिर होण्याच्या तक्रारी जाणवतात. या तक्रारी असतील तर आपल्या थकव्याचे कारण वेगळे आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. अशा प्रकारच्या समस्या शरीरातील विटामिन बी च्या कमतरतेमुळे होऊ शकतात. यासाठी रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे.
विटामिन बी आणि डी ची नियमित तपासणी आवश्यक
विटामिन बी च्या कमतरतेमुळे थकवा येतो. त्यामुळे किमान सहा महिन्यातून एकदा शक्य नसेल तर किमान वर्षातून एकदा विटामिन बी आणि विटामिन डी ची तपासणी होणे आवश्यक आहे.आपल्या शरीरातील पाण्यात विरघळणारे अत्यावश्यक जीवनसत्व म्हणजे विटामिन बी होय.हे शरीर स्वतः तयार करू शकत नाही. त्यामुळे ते आहारातून किंवा आवश्यक असल्यास औषधांच्या स्वरूपात घ्यावे लागते.
विटामिन बी च्या अभावामुळे या समस्या निर्माण होतात
विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे सतत थकवा आणि अशक्तपणा येणे, चक्कर येणे,हातापायांना मुंग्या येणे ,स्मरणशक्ती कमी होणे, जीभ दुखणे किंवा लालसर होणे, श्वास लागणे, रक्ताची कमतरता होणे या समस्या निर्माण होतात. भरपूर आराम करूनही अशक्तपणा येत नसेल तर विटामिन बी ची कमतरता आहे हे ओळखावे आणि रक्ताची तपासणी करून खात्री करावी आणि त्यानंतरच तातडीने व्हिटॅमिन बी ची कमतरता भरून काढण्यासाठी विटामिन बी 12 ची गोळी घ्यावी.