सध्या जून 2026 मध्ये फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या विश्वचषक स्पर्धेच्या एकूण इतिहासात सर्वात अधिक वेळा विश्वचषक जिंकणारा संघ म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते. ब्राझीलने सर्वाधिक पाच वेळा विश्वचषक पटकावलेला आहे. याच ब्राझीलला रविवारी पराभव टाळण्यासाठी नवख्या मोरोक्कोबरोबर झगडावे लागले. अखेर बरोबरीत सामना सुटला आणि ब्राझीलची पराभवाची नामुश्की टळली.