देशातील अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचे केंद्र सरकार नेहमीच सांगत आले आहे. मात्र देशातील राज्यांची आर्थिक स्थिती धक्कादायक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. कॅगच्या अहवालानुसार देशातील राज्यांची स्थिती खूपच चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रासह तब्बल 15 राज्यांना 2024/ 25 या आर्थिक वर्षात महसूली तुटीचा सामना करावा लागला आहे.
राज्यांची आर्थिक स्थिती
भारतातील राज्यांच्या आर्थिक स्थितीची झलक नेमकी कशी आहे हे कॅगने नेमक्या शब्दात सांगितले आहे. देशातील एकूण राज्यांपैकी महसुली अधिशेषअसलेली 13 राज्ये आहेत. 15 राज्ये अशी आहेत की महसुली तूट मोठ्या प्रमाणात आहे. एकूण तूट तेरा लाख 46 हजार 385 कोटी इतकी महसुली एकत्रित तूट सर्व राज्यांची मिळून आहे. 90.51 लाख कोटी रुपये सर्व राज्यांची एकूण देणी आहेत.तर 51.20 लाख कोटी रुपये राज्यांचा एकत्रित अर्थसंकल्पीय खर्च आहे.43% वेतन आणि निवृत्ती वेतन व व्याजावरील खर्च आहे. एकंदरीतच देशाची आर्थिक स्थिती राज्यांच्या कर्जाच्या डोंगराचा विचार केला तर खूपच खालावलेली दिसत आहे. पण काही ठराविक संस्थांच्या वाढत्या आर्थिक स्थितीमुळे देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत चालली आहे असे म्हटले जाते. प्रत्यक्ष वस्तुस्थिती फारच वेगळी आहे.