Crude oil prices fall 5%-कच्च्या तेलाच्या दरात पाच टक्के घसरण: शेअर बाजारातही उसळी

गेल्या 107 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका- इस्रायल युद्धाचा मोठा परिणाम तेलाच्या किमतीवर झाला आहे. जगात मंदी येण्याची भीती व्यक्त केले जात होती. भारतातही तेलाचा मोठा साठा आयात केला असला तरी गेल्या दोन महिन्यात प्रचंड महागाई वाढली असून तेलाचे दर वाढलेत. मात्र इराण-अमेरिका शांतता करारावर सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता असल्याने कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पाच टक्क्याहून अधिक घट झाली असून नजीकच्या काळात भारतात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडलेल्या अवस्थेत असून कच्च्या तेलाच्या उतरत्या दरामुळे अर्थव्यवस्थेला थोडासा दिलासा मिळाला आहे.

जागतिक बाजारात ब्रेंट क्रुड 4.1 टक्क्यांनी घसरून 83.75 डॉलर प्रति बॅरलवर आले, तर अमेरिकी डब्ल्यूटीआय क्रूड 4.72 टक्क्यांनी घसरून 80.87 डॉलरवर स्थिरावले. याचे थेट पडसाद भारतीय बाजारातही उमटले. भारतीय बाजारातील अनेक शेअर्स उसळले असल्याने शेअर धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु अद्यापही कित्येक शेअर भागधारक शेअर बाजारात अडकून पडले आहेत.लवकरच त्यांची स्थिती सुधारून ते या मंदीतून सावरतील.

शांतता करारामुळे काय स्वस्त होऊ शकते?

इराण-अमेरिका शांतता करारामुळे अनेक गोष्टींमध्ये स्वस्ताई येऊ शकते. जीवनावश्यक वस्तूंमध्ये डाळी, तांदूळ, गहू, साखर, खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला स्वस्त होऊ शकतात. बांधकाम साहित्यामध्ये सिमेंट, लोखंड, वाळू,खडी, टाइल्स, घरासाठी लागणाऱ्या इतर साहित्यांच्या किमती स्वस्त दरात मिळतील. त्यामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याचे आढळले असले तरी आता त्याला नक्कीच पुन्हा जोर लागेल. मालवाहतुकीवरही परिणाम होणार असून इंदर दरवाढीमुळे मालवाहतूक वाढली होती. त्याचे भाडे आता थोडे कमी होईल. घरगुती गॅस, व्यावसायिक गॅसचे सुद्धा दर कमी होतील .कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने कमी होत राहिल्यास डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होईल आणि स्वस्ताई लवकरात लवकर होईल.

Leave a comment