भारतीय राजकारणात कधी नव्हे इतकी वाईट परिस्थिती प्रथमच निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पक्षाने प्रत्येक पक्ष फोडण्याचा सपाटाच लावलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये एनतेन प्रकारे मोडतोड करून भाजपाची सत्ता आणली आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फोडून त्यांचा वेगळा गट करून त्यांना मान्यताही दिली. तेच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धवशेनेचे नऊ पैकी सहा खासदार फोडून वेगळा गट करण्याचा प्रयत्न चालू आहे. या खासदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपये दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
लोकसभेमध्ये उन्हाळी अधिवेशनात खासदारांची संख्या वाढवण्यावरून विधेयक आणले होते. हे विधेयक भाजपाकडे दोन तृतीयांश बहुमत नसल्यामुळे फेटाळले गेले. त्याचे शल्य भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना होते. म्हणून त्यांनी त्यानंतर एका पाठोपाठ एक पक्ष फोडण्यास सुरुवात केली आहे. हे विधेयक पुन्हा आणण्यासाठी त्यांना 350 हून अधिक खासदार लागतात. आणि तेच काम सध्या सरकार करत आहे. भारतीय राजकारणाच्या इतिहासात इतक्या खालच्या पातळीवर कोणत्याही सरकारने पक्षफोडीचे काम केलेले नसेल. अशा प्रकारे सध्या भारतात राजकारण चालू आहे.
उद्धव सेनेचे सहा खासदार तुटणार?
गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धवसेनेचे नऊ खासदार निवडून आले होते.त्यातील सहा खासदार फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते सहा खासदार म्हणजे भाऊसाहेब वाकचौरे ,नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय दिना पाटील हे होत. खरे तर यांना गद्दार हा शब्द खूप हलका वाटतो. यांना कोणती उपमा द्यावी हाच प्रश्न पडतो.