19 जून हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर 19 जून ही तारीख जाणीवपूर्वक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करारासाठी राखीव ठेवलेली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध समाप्ती करण्यासाठी तयार केलेल्या प्राथमिक करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इराण होर्मुझ सामुद्रधुनी खुली करेल आणि निर्बंधाशिवाय तेलविक्री करू शकेल असा या करारातील काही भाग उघड झाला आहे. स्वित्झर्लंडमध्ये त्या करारावर औपचारिक स्वाक्षऱ्या होतील.
इराण अमेरिका करार नेमका काय आहे?
19 जून 2026 रोजी होणाऱ्या इराण-अमेरिका करारात इराणने तातडीने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा प्रस्ताव आहे. अमेरिकेकडून इराणला तातडीने मुक्त तेल विक्रीची परवानगी आणि नंतर सर्व निर्बंध हटवण्याचे आश्वासन दिले आहे.युद्धानंतर इराणच्या पुनर्बांधणीसाठी 300 अब्ज डॉलरची मदत देण्याचे अमेरिकेने कबूल केले आहे. 2015 च्या अणुकरारापेक्षा अधिक सवलती इराणला मिळणार आहे. 60 दिवसात अंतिम अणुकरारावर चर्चा होणार आहे.