Iran US peace agreement-अखेर इराण-अमेरिका शांतता करार : साडेतीन महिन्यांनी युद्धविराम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या इराण-अमेरिका बैठकीत शांतता करारावर सह्या होतील असे अगोदरच जाहीर केले होते. त्याप्रमाणे इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार झाला असून ट्रम्प, पेझेश्कियन यांच्याकडून करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.आता होर्मुझ खाडी सुद्धा खुली सोन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

करारातील महत्त्वाचे मुद्दे

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम लागू झाला आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा सुरू होईल. होर्मुझ समुद्रधुनी दोन महिन्यांसाठी शुल्कमुक्त खुली केली जाईल. अमेरिका इराणवरील काही आर्थिक निर्बंधांमध्ये सवलत देईल. लेबेनॉनच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याची बांधिलकी पुन्हा व्यक्त करण्यात आली आहे; पण ठोस आश्वासन नाही. इराणवर दबाव कायम आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री हेगसेथ यांनी इराणने करारातील अटींचे पालन केले नाही तर पुन्हा कठोर नौदल नाकेबंदी लागू होऊ शकते असा इशारा दिला आहे. तसेच कोणतीही कारवाई इराणच्या अणुकार्यक्रमाची केंद्र असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a comment