Uddhav Sena MPs skip meeting-उद्धव सेनेच्या सहा खासदारांनी व्हीप डावलला: बैठकीला गैरहजर

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमध्ये खासदार, आमदार फोडाफोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. त्याचा दुसऱ्यांदा फटका उद्धव सेनेला बसत आहे.उद्धव सेनेचे नऊ पैकी सहा खासदार कालच्या बैठकीला अनुपस्थितीत राहिल्याने त्यांच्यावर शो कॉज नोटीस लागू केलेली आहे. अर्थात हे सहाही खासदार आपला वेगळा गट तयार करतील किंवा शिंदेसेनेत सामील होतील असे दिसते.

गेल्या बारा वर्षात कायद्याचे सर्व नियम धाब्यावर बसून पक्ष फोडीचे राजकारण भारतात सुरू आहे. जरी उद्धवसेनेने व्हीप जारी केली असली तरी त्याचा न्यायालयात निकाल हा सहा खासदारांच्या बाजूनेच लागणार हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. न्यायव्यवस्था कमकुवत झाली आहे.

कायद्याच्या रक्षकांनाच वाय प्लस सुरक्षा

खरे तर निवडून गेलेल्या खासदार आमदारांकडून सर्वसामान्य जनतेला न्याय हवा असतो कायद्याच्या चौकटीत बसून सर्वसामान्य लोकांना न्याय हवा असतो. पण आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात या फुटीर खासदारांना वाय प्लस ची सुरक्षा देण्यात आली आहे.यावरून या खासदारांची लायकी काय आहे हे समाजामध्ये दिसून आली. जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ आहे.हा प्रक्षेप कधीतरी उसळी घेईल अशी स्थिती भारतात निर्माण होत आहे.

Leave a comment