Maharashtra monsoon update-मान्सूनची प्रतीक्षा संपणार : महाराष्ट्रात 25 जून पासून मान्सून सक्रिय होणार

2025 मध्ये 15 मे रोजीच मान्सूनने आपली उपस्थिती दाखवून सलग पाच महिने संपूर्ण भारतात पावसाची नोंद केली होती. पण यावर्षी म्हणजे 2026 साली जून महिना संपत आला तरी मान्सूनची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे देशभरात पाण्यावाचून हाहाकार उडाला आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. पाण्याचे दर वाढलेले आहेत. टॅंकरने पाणीपुरवठा काही ठिकाणी होत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पुरेसा पुरवठा होत नाही. संपूर्ण भारतात मान्सूनच्या लांबणीचा फटका बसत असून पाण्यावाचून लोकांचे हाल होत आहे. असे असले तरी हवामान खात्याच्या अंदाजानुसार नैर्ऋत्य मान्सून दक्षिण महाराष्ट्राच्या भागातच अडकून पडला असून सर्वसाधारणपणे 25 ते 24 जून पासून तो गतिमान होण्याची शक्यता वर्तवली आहे. 22 जून पासून महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी आशा आहे अरबी समुद्रात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची गती थोडी कमी झाल्यामुळे मान्सून आणखी थोडा लांबणीवर पडला आहे.

Leave a comment