Mexico reaches knockout stage-यजमान मेक्सिको बाद फेरीत : दक्षिण कोरिया पराभूत

अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये यजमान मेक्सिकोने दक्षिण कोरियावर 1 – 0 अशी मात करून बाद फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वात प्रथम बाद फेरीत पोहोचणारा संघ म्हणून मेक्सिकोकडे पाहिले जात आहे. 2022 च्या विश्वचषकात सुरुवातीला बाहेर पडलेल्या मेक्सिकोसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे.

मेक्सिको आणि दक्षिण कोरिया यांच्या झालेल्या अटीतटीच्या लढाईत दक्षिण कोरीयाच्या बचावातील त्रुटीचा फायदा घेत मेक्सिकोने एक गोल केला आणि तो गोल विजयाचा साक्षीदार ठरला. याच गोलमुळे मेक्सिको आता बाद फेरीत पोचला आहे.

Leave a comment