Benefits of Adulsa plant-अडुळसा : आयुर्वेदातील अमृत वनस्पती; जाणून घ्या उपयोग आणि महत्त्व

अडुळसा ही एक औषधी वनस्पती असून आरोग्यासाठी आणि औषधासाठी अत्यंत लोकप्रिय आणि सहज उपलब्ध होणारी अशी वनस्पती आहे. सर्दी आणि खोकल्यावर गरीबाचे औषध म्हणून आडोशाला वेगळेच महत्व आहे.
अडुळसाचे शास्त्रीय नाव Adhatoda vasica असे आहे.अडुळसा ही एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात तिला वासा असेही म्हणतात. खोकला, सर्दी आणि श्वसनविकारांवर अडुळसा विशेष उपयुक्त मानला जातो.

अडुळशाचे महत्त्व The Importance of Adulsa

अडुळसा ही श्वसनसंस्थेसाठी अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पती आहे.आयुर्वेदातील अनेक कफनाशक औषधांमध्ये तिचा वापरकेला जातो. ही वनस्पती घरगुती उपचारांमध्ये सहज उपलब्ध होते.औषधी गुणधर्मांमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सहज उपलब्ध होते.पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त अशी वनस्पती आहे.

अडुळशाचे उपयोग Benefits of Adulsa

1. खोकला आणि सर्दी:

अडुळशाच्या पानांचा रस मधासोबत घेतल्यास खोकला, घशातील खवखव आणि सर्दीमध्ये आराम मिळतो.

2. दमा आणि श्वसनविकार

अडुळशामध्ये कफ पातळ करण्याचे गुणधर्म असल्याने दम्याच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो.

3. ताप कमी करण्यास मदत

पानांचा काढा तापामध्ये सहाय्यक ठरतो.

4. घशाचे विकार

घसा बसणे, घशात सूज येणे यावर अडुळशाचा काढा उपयुक्त मानला जातो.

5. रक्तशुद्धी

काही आयुर्वेदिक उपचारांमध्ये रक्तशुद्धीसाठी अडुळशाचा वापर केला जातो.

6. जखमांवर उपयोग

पानांचा लेप किरकोळ जखमा आणि सूज कमी करण्यासाठी वापरला जातो.
अडुळशातील औषधी घटक
वॅसिसीन (Vasicine)
वॅसिसिनोन (Vasicinone)
आवश्यक तेल
विविध अल्कलॉइड्स

अडुळशाची लागवड

ही वनस्पती मध्यम ते उष्ण हवामानात चांगली वाढते.कलमे किंवा फांद्यांपासून लागवड करता येते.कमी देखभालीत वाढणारी वनस्पती आहे.

Leave a comment