अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वादग्रस्त विधाने करण्यात आणि वादग्रस्त निर्णय करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या लहरीपणाला अमेरिकेच्या सिनेटने आणि न्यायालयाकडून चांगलीच अटकाव केला आहे. इराणविरोधी लष्करी कारवाईला आळा घालणारा ठराव सिनेटने मंजूर केला आहे. तर न्यायालयाच्या आवारातील अटकेवर कोर्टाची देशव्यापी बंदी घातली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना दोन झटके Two setbacks for Trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतंत्र घटनांमध्ये जोरदार दोन धक्के बसले आहेत. इराणविरुद्ध अमेरिकेच्या लष्करी कारवाईला आळा घालण्याच्या उद्देशाने अमेरिकी सिनेटने प्रथमच युद्धाधिकार ठराव मंजूर केला. तर दुसऱ्या घटनेत अमेरिकी सरकारने आरोपीला इमिग्रेशन न्यायालयाच्या परिसरात अटक करण्यास एका न्यायाधीशाने मनाई केली आहे. गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरू झालेली ही प्रथा थांबवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
ट्रम्प यांच्याकडून निर्णय प्रक्रियेचा अभाव
इमिग्रेशन न्यायालयाच्या आवारात अटक न करण्याच्या दीर्घकालीन धोरणात ट्रम्प प्रशासनाने केलेला बदल हा केवळ अयोग्य निर्णयाचा परिणाम नव्हता तर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचाच पूर्ण अभाव होता. या शब्दात अमेरिकेच्या जिल्हा न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प सरकारला फटकारले आहे. न्यायालयाच्या परिसरातील अटकेबाबतचा हा दुसरा मोठा धक्का आहे.