महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे हे फारच गाजत आहेत. तुकाराम मुंडे यांचे नि:स्पृह आणि भ्रष्टाचारमुक्त कार्य पाहून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा धुमाकूळ चालला असून तुकाराम मुंढेंनी मात्र आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या खात्यामध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार करून महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला एक आदर्श घालून दिला आहे. तुकाराम मुंढे आणि त्यांची बदली हे समीकरण जवळजवळ महाराष्ट्राला पाठच झाले आहे; पण त्यांची वाढती लोकप्रियता पाहून मंत्र्यांनाही आता सांगावे लागले की तुकाराम मुंढे यांची तूर्त बदली नाही. तुकाराम मुंढे यांच्याकडे सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे खाते आहे. त्यांनी बाजारात असलेल्या सर्वच बनावट औषधांवर कारवाईचा धडाका लावला आहे. याशिवाय अन्नातील भेसळ, हॉटेल मालकांविषयीचे नियम अशा अनेक गोष्टी त्यांनी चांगले निर्माण केल्या आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांचं नाव काढताच भेसळ करणारे मग ते दुधात भेसळ करणारे असो की पाण्यात असो, तेलात असो की धान्यात असो सर्वांनीच धक्का घेतला आहे. अशा या प्रामाणिक आणि नि:स्पृह अधिकाऱ्याची सरकारतर्फे वारंवार बदली करून त्यांना त्रास दिला जातो. पण तुकाराम मुंढे कधीही कुणालाही डगमगले नाहीत. वाकले नाहीत. आपले स्वच्छ प्रशासन हाच आपला अजंठा त्यांनी कायम चालू ठेवला आहे.