पृथ्वीच्या अंतर्गत भागात घडामोडी सतत चालू असतात. त्यातून भूकंप केव्हा होईल हे निश्चित सांगता येत नाही. भूकंप संदेश यंत्रे अनेक देशांनी बसवलेली असली तरी हा भूकंप अनपेक्षितपणेच येतो.दक्षिण अमेरिकेतील तेलसंपन्न देश म्हणजेच व्हेनेझुएला होय. या व्हेनेझुएला येथे बुधवारी संध्याकाळी शतकातील सर्वात मोठा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 7.2 आणि 7.5 रिस्टर स्केल अशी होती. या प्रचंड तीव्रतेच्या भूकंपाने संपूर्ण व्हेनेझुएलाला हादरवून टाकले. यामध्ये मृतांच्या आकडेवारीत 188 लोक ठार झाले अशी बातमी असली तरी त्याहून अधिक लोक ठार झाल्याची शक्यता आहे. सुमारे 1500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार मृतांची संख्या दहा हजारांहूनहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भूकंपानंतर कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल सी रोडएक्स यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे.
पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्या
व्हेनेझुएला येथे झालेल्या तीव्र भूकंपामुळे अनेक इमारती पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे कोसळल्या. बुधवारी संध्याकाळी 7.2 आणि 7.5 रिस्टर स्केल तीव्रतेचे लागोपाठ दोन शक्तिशाली भूकंपाने संपूर्ण व्हेनेझुएलाला हादरवून टाकले. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की कॅराकास पासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्वाइरामध्ये शेकडो इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या. यात हजारो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. दहा हजारहून अधिक लोक ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.