Ayodhya Ram Mandir Trust-अयोध्येत महाभ्रष्टाचाराचा आरोप; राम मंदिर ट्रस्टच्या महासचिवांचा राजीनामा

भारतातील अनेक मंदिरे म्हणजे भ्रष्टाचाराचे उगमस्थानच झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामा मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. तो उघडकीस आला आहे; पण कारवाई काय झाली हेच समजत नाही.अशा बहुतांश मंदिरात पैशाच्या रूपात, दागिन्यांच्या रूपात लोक मदत करतात , त्या देणगीवर तेथील व्यवस्थापक, पुजारी डल्ला मारतात. हे आता सर्वश्रुत आणि सर्व ळमान्य झाले आहे की काय?राम मंदिर येथीलही भ्रष्टाचार रोखता आला नाही. तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांनी दिलेले चांदीची वीट सुद्धा चोरीला गेली. अशा कितीतरी देणग्या रजिस्टरला नोंदवलेल्याच नाहीत. खरं तर अशा मंदिरांना देणग्या देणे हे साफ चुकीचे आहे. प्रगत राष्ट्रांमध्ये शाळांना मदत दिली जाते. शाळा सर्व सुविधायुक्त बनवल्या जातात. संपूर्ण शाळा या सरकारी मालकीच्या असतात. आपल्या देशात मात्र सरकारी शाळांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. अनेक शाळा बंद पाडलेल्या आहेत. एकीकडे शिक्षणाच्या बाबतीत दुर्लक्ष होत असताना सरकार आणि लोक हे मंदिरांना देणग्या देतात. ही बाब खरोखरच दुर्दैवाची आहे.

राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि ट्रस्ट अनिल मिश्रा यांचा राजीनामा

राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरण गळ्याशी येऊ लागल्यावर मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्रस्टचे अध्यक्ष महंत गोपाल गोपालदास यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनीही राजीनामा दिला आहे. या आधीच आठ देणगी चोरांना अटक करण्यात आली आहे. देणगी मधील अनियमित प्रकरणी विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर वाढता दबाव लक्षात घेत ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.

Leave a comment