Benefits of Rambutan-रांबुटान फळ : आरोग्याचा खजिना; जाणून घ्या फायदे आणि पोषणमूल्य

जगभरात अनेक विदेशी फळे लोकप्रिय आहेत .रांबुटान Rambutan फळ हे असेच लोकप्रिय आहे. हे फळ दिसायला आकर्षक वरून लालसर मऊ केस असतात.आतमध्ये पांढरा गर असतो. घरामध्ये मधोमध बी असते हे फळ खूप आकर्षक, पौष्टिक आणि चविष्ट असल्यामुळे ते खूपच लोकप्रिय आहे. जरी हे फळ विदेशी असले तरी भारतात केरळमध्ये मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन घेतले जाते.या फळाला रामबुटान फळ असेही म्हणतात.

रांबुटान म्हणजे काय? What is Rambutan?

रांबुटान हे उष्णकटिबंधीय सदाहरित झाडाचे फळ आहे. विशेषतः या फळाचं फळाचा जन्म मलेशियात झाला असे वाटते.
मलेशियन भाषेत Rambut म्हणजे केस असा अर्थ होतो. म्हणजेच या फळाच्या पृष्ठभागावर केसाळ स्वरूपाचा भाग असतो. त्यालाच रांबुटान असे नाव पडले आहे. हे फळ दिसायला लिचीसारखे असते. मात्र त्याच्या सालीवर मऊ,वाकडे काटे असतात. आत पांढऱ्या रंगाचा रसाळ, गोड, किंचित आंबटसर गर असतो.

रांबुटानचे पोषणमूल्य Nutritional value of rambutan

साधारणतः शंभर ग्रॅम रांबुटान फळामध्ये 68 ते 75 ग्रॅम कॅलरी असते. 16 ते 18 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते. दोन ते तीन ग्रॅम तंतू म्हणजे फायबर असते. विटामिन सी भरपूर असते. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स याचे भरपूर मिश्रण या फळांमध्ये असते. त्यामुळे हे फळ लोकप्रिय आहे. सर्वसाधारणपणे या फळाचा दर 300 रुपये ते 800 रुपये असतो. ज्या ठिकाणी हे फळ पिकते तेथे मात्र या फळाचा दर थोडा कमी म्हणजे 300 ते 500 रुपये असतो. कर्नाटक ,महाराष्ट्रात हे रांबुटान फळ विकायला येते, तेव्हा त्याचा दर 600 ते 800 रुपये असतो.

रांबुटान फळ खाण्याचे फायदे Benefits of Rambutan

रांबुटान या फळाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे रोग प्रतिकारक आहे. याशिवाय हृदयाचे आरोग्य चांगल्या प्रकारे जपण्याचे काम हे फळ करते. पचनक्रिया चांगली सुधारते. त्वचेला पोषणमूल्य चांगले मिळते. त्यामुळे त्वचा तजेलदार राहते.

1 रांबुटान फळांमध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

2 या फळांमध्ये फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते पचनक्रिया चांगली सुधारते.

3 रांबुटानमध्ये पोटॅशियम असल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगल्या प्रकारे जपण्याचे काम हे फळ करते. रक्तदाब नियंत्रित करण्याचे काम हे फळ करते.

4 रांबुटान फळामध्ये लोह उपलब्ध असल्यामुळे रक्त निर्मितीसाठी हे फळ अत्यंत लाभदायक आहे.

5 या फळात नैसर्गिक साखर असल्यामुळे हे फळ खाल्ल्याने उत्साह वाढतो .ऊर्जा मिळते.

6 हे फळ अँटऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेवरील मुक्त रॅडिकल्सचा परिणाम कमी होतो. त्वचा टवटवीत आणि तजेलदार दिसते.

रामबुटान हे फळ नियमित खा आणि आरोग्यदायी जीवन जगा.

Benefits of Adulsa plant-अडुळसा : आयुर्वेदातील अमृत वनस्पती; जाणून घ्या उपयोग आणि महत्त्व

Leave a comment