रुई हे भारतात सर्वत्र आढळणारे भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचे झाड आहे. रुईच्या झाडाचे खूप फायदे आहेत( Benefits of Calotropis ,Rui)धार्मिक आणि औषधी वनस्पती म्हणून या वनस्पतीला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.रुई या वनस्पतीला अर्क ,आक, मदार अशी पण नावे आहेत.आयुर्वेदात याचा योग्य प्रमाणात व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधी उपयोग केला जातो. मात्र या वनस्पतीचा पांढरा चिक (latex) विषारी व त्वचेला त्रासदायक असू शकतो. त्यामुळे त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
रुईच्या फुलांचे उपयोग Benefits of Calotropis flowers

पारंपरिक पद्धतीत सर्दी, खोकला आणि पचनासंबंधीच्या तक्रारीमध्ये रुईच्या फुलाचा वापर केला जातो. हा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार केला जातो. काही भागात रुईच्या फुलांची भाजी केली जाते. परंतु योग्य प्रक्रिया करणे आवश्यक असते.
रुईच्या पानांचे उपयोग Benefits of Calotropis (Rui) leaves
रुईची गरम केलेली पाने सांधेदुखी, गुडघेदुखी आणि स्नायूदुखीवर बाहेरून शेकासाठी वापरली जातात. एखाद्या ठिकाणी मार लागून सूज आली असेल तर अशी सूज कमी करण्यासाठी पारंपारिक उपचारांमध्ये पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.टाचदुखी आणि पायांच्या वेदनांमध्ये गरम पानांचा शेक दिला जातो. काही ठिकाणी छातीवर गरम पाने ठेवून सर्दीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय केला जातो.
रुईच्या फळांचा उपयोग Benefits of Calotropis (Rui) fruits
रुईचे फळ पिकल्यावर त्यातील बिया व कापसासारखे तंतू बाहेर येतात. हे तंतू उशा, गाद्या आणि उशीसाठी भरण म्हणून वापरले जातात. बियांचा उपयोग नवीन रोपे तयार करण्यासाठी होतो. फळांचा औषधी उपयोग मर्यादित असून तो तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. रुईच्या बियांपासून तेल काढण्यावर संशोधन झाले आहे.बियांचा मुख्य उपयोग लागवडीसाठी केला जातो. काही आयुर्वेदामध्ये औषधांसाठी सुद्धा बिया वापरल्या जातात.