महाराष्ट्र राज्य अन्न आणि औषध सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आता आपला मोर्चा दूध सम्राटांकडे वळवला आहे. त्यांनी दुधातील भेसळ रोखण्यासाठी कडक नियमावली लागू केली आहे. नियमावलीचे उल्लंघन केल्यास परवाने रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. नागरिकांना सुरक्षित, शुद्ध आणि भेसळमुक्त दूध उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीसाठी कडक नियमावली लागू केली आहे.
‘स्वच्छ दूध सुरक्षित आरोग्य’ – नवा आदेश
दूध संकलन केंद्रे , बल्क मिल्क, कुलर्स, चीलिंग सेंटर , प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार, वितरक तसेच घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी एक समान नियम लागू करण्यात आले आहेत. कच्च्या दुधाच्या प्रत्येक पात्रावर रॉ मिल्क असा स्पष्ट उल्लेख करणे आणि ते सेवनापूर्वी उकळण्याची सूचना देणे बंधनकारक आहे. पाश्चराईज्ड दूध केवळ शील बंद व लेबलयुक्त पॅकेजिंग मध्येच विक्री करता येणार. दूध हाताळण्यासाठी फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलची पात्रे वापरणे, शीत साखळीचे काटेकोर पालन करणे, दुधाच्या श्रोता पासून ग्राहकांपर्यंतची संपूर्ण नोंद ठेवणे, आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे वैध वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र असणे सक्तीचे केले आहे.
दुधातील भेसळ ही जनतेच्या आरोग्याशी केलेली गंभीर तडजोड आहे. अशा प्रकारांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. असे अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
नव्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्नसुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत कठोर प्रशासकीय दिवाणी आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि चुकीचे दावे करणाऱ्या विरोधात कमाल कारवाई करण्यात येईल. एफ डी ए ने राज्यभर केलेल्या तपासणी दुधामध्ये पाण्याची भेसळ युरिया , डिटर्जंट कॉस्टिक सोडा, स्टार्च, हायड्रोजन पेरॉक्साईड, फार्मालीन यासारख्या घातक रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करणे, शीत साखळीचे पालन न करणे, विनापरवाना व्यवसाय, चुकीचे लेबलिंग आणि अस्वच्छ परिसरातील दूध प्रक्रिया केल्याचे प्रकार आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ दूध सुरक्षित आरोग्य’ भेसळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत राजव्यापी कारवाई हाती घेण्यात आली आहे.
महाराष्ट्रात तुकाराम मुंढे यांनी अनेक कारवाया करून आपल्या स्वच्छ कर्तृत्वातचा परिचय करून दिला आहे
तुकाराम मुंढे एकटेच लोकप्रिय आहेत. तुकाराम मुंढे यांच्यासारखे स्वच्छ आणि निर्भय कार्य करून इतरही अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे असे लोकांना अपेक्षित आहे.