फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आता चांगलीच रंगत आलेली आहे. फ्रान्सचा एम्बापे आणि अर्जेंटिनाचा मेस्सी यांनी फिफा वर्ल्ड कप 2026 च्या लढतीत चांगलीच रंगतदार कामगिरी करून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम केले आहे.
आतापर्यंत आपल्या दमदार खेळाने समोरच्या संघाला सहज नमवलेल्या फ्रान्सला शनिवारी मध्यरात्री पॅराग्वेने चांगलेच झुंजविले. परंतु पेनल्टी शुटद्वारे किलियन एम्बाप्पेने केलेला गोल फ्रान्ससाठी जीवदान ठरला आणि या जोरावर त्यांनी पॅराग्वेला 1 – 0 नमवून फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
गोल्डन शूजसाठी एम्बाप्पे- मेस्सीत चुरस
फुटबॉल विश्वचषक स्पर्धा दरवर्षी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट देते. आता यावर्षी तो मान कोणाला मिळेल यात साशंकता निर्माण झाली आहे. या गोल्डन बुट साठी दोनच खेळाडू स्पर्धेत आहेत. या स्पर्धेत एम्बाप्पे आणि मेस्सी यांनी अनुक्रमे सात गोल केले असून त्या दोघांची संयुक्तिक आघाडी आहे. विश्वचषक स्पर्धेपर्यंत जास्तीत जास्त गोल जो खेळाडू करेल त्याला हे गोल्डन शूज मिळेल.
आत्तापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेत मेस्सीने वीस गोल केले असून एम्बाप्पेने 19 गोल केले आहेत.एम्बाप्पेला मेस्सीच्या विक्रमाची बरोबरी करायला केवळ एका गोलची आवश्यकता आहे.तो मेस्सीपेक्षा तरुण खेळाडू आहे. त्याला मेस्सीचा विक्रम मोडण्यासाठी खूप संधी आहे.