Nagpanchami-“नागपंचमी- सर्पसंवर्धन आणि आपल्या परंपरेचा सण”

नागपंचमी हा सण केव्हा साजरा केला जातो? When is the festival of Nagpanchami celebrated?

Nagpanchami हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दरवर्षी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतात.हा सण तारखेनुसार येत नसून तिथीनुसार येतो.

नागपंचमीच्या कथा: Stories of Nagpanchami

नागपंचमीच्या बाबतीत भारतात अनेक प्राचीन आख्यायिका आहेत.अनेक लहानमोठ्या संस्कृतींचा मिलाफ म्हणजे भारतीय संस्कृती होय.प्रत्येक संस्कृतीचे एक दैवत असे .त्याची ते पूजा करत असत. नागा संस्कृती ही त्यांतीलच एक संस्कृती आहे.नागा लोक नागाची पूजा करतात . प्राचीन काळी सांस्कृतिक संघर्ष जसा झाला,तसे सांस्कृतिक विलिनीकरण सुद्धा झाले.तमाम भारतीयांनी नागा संस्कृती कडून नागपंचमीचा सण घेतला.नागा लोक महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी राहत होते.पन्हाळगडावर सुद्धा त्यांचे वास्तव्य होते.पराशर ऋषींच्या काळात नागा संस्कृती आणि स्थानिक लोक यांच्यात संघर्ष झाला होता.आजही आपल्या समाजात नागा लोक राहत आहेत;पण त्यांचे अस्तित्व स्वतंत्र असे नाही.

नागा संस्कृतीकडून आलेला नागपंचमी हा सण भारतात आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात हा सण स्त्रीप्रधान आहे.या दिवशी स्त्रिया महाराष्ट्रीय वेशभूषा परिधान करतात.भावाचा(नागाचा) उपवास धरतात.वडाच्या पारंब्यांना झोके बांधून झोके घेतात.नागाची मनोभावे पूजा करतात.दुधाचा ,लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.घरोघरी नागोबाचे पूजन केले जाते.
साप हा शेतकऱ्याचा मित्र: Snake is the farmer’s friend
साप किंवा नाग हा केवळ शेतकऱ्यांचाच मित्र नाही,तर सर्वांचा मित्र आहे.तो शेतातील उंदरांवर नियंत्रण ठेवून,पिकांचे रक्षण करतो.

नाग/साप डूक धरतो का?

नाग हा मांसाहारी प्राणी आहे.तो दूध पित नाही.त्याला कान नसतात.सापाला ऐकू येत नाही.पण त्याचे स्पर्शेंद्रिय खूप संवेदनशील असते. जमिनीच्या आणि हवेच्या कंपनावरून त्याला शत्रूची चाहूल लागते आणि तो सावध होतो.सापाचा मेंदू खूप लहान असतो.त्यामुळे त्याला स्मरणशक्ती खूप कमी असते.त्यामुळे साप डूक धरतो,अशी लोकांची समजूत आहे ती चुकीची आहे.

नागाचा नैवेद्य

वेगवेगळ्या प्रदेशात नागाला वेगवेगळ्या प्रकाराचा नैवेद्य दाखवला जातो कोल्हापूर जिल्ह्यात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे नागा संस्कृती ही कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पसरलेली होती. या नागपंचमी दिवशी नागाला उकडीच्या करंज्या( कानोले) आणि लाह्या यांचा नैवेद्य दाखवला जातो. उकडीच्या करंज्या करण्याची प्रथा कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आढळते. कोल्हापूर जिल्ह्यात बत्तीस शिराळा, वाघापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागपंचमीचा सण साजरा केला जातो.

बत्तीसशिराळा आणि नागपंचमी

32 शिराळा या नावातच मोठी गंमत आहे. शिराळा हे इतिहासकालीन एक प्रसिद्ध गाव या गावांमध्ये आजूबाजूच्या 32 गावांचा महसूल गोळा केला जायचा आणि तो शिराळा येथे जमा केला जायचा. आणि त्यातूनच या गावाचे नाव 32 शिराळा असे पडले.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या बत्तीस शिराळा या ठिकाणी भारतातील जगप्रसिद्ध नागपंचमी भरली जाते. बत्तीस शिराळा येथे एकेकाळी हजारो साप पकडले जायचे आणि त्याचे प्रदर्शन नागपंचमी दिवशी केले जायचे.देश विदेशातून लोक बत्तीस शिराळा येथे नागपंचमीला यायचे आणि विविध नागांचे खेळ,प्रदर्शन, मिरवणूक पाहण्याचा आनंद घ्यायचे. नागपंचमी दिवशी या गावात एकही माणूस सर्प दंशाने मृत्युमुखी पडलेला नाही. असा या गावचा इतिहास आहे. पण पुढे ही प्रथा प्राण्यांचे चेष्टा करणे, प्राण्यांना पकडून ठेवणे आणि त्यांचे हाल करणे हे कायद्याने गुन्हा असल्याने हळूहळू ही प्रथा बंद पडू लागली. तरी सुद्धा आजही थोड्या प्रमाणात बत्तीसशिराळा येथे नागपंचमी भरते. पण पंधरा-वीस वर्षांपूर्वी नागपंचमी जशी भरायची तशी सध्या नागपंचमी पाहायला मिळाले मिळत नाही. बत्तीस शिराळ आहे ठिकाण नागपंचमीसाठी जगप्रसिद्ध होते आणि आहे.

भारतात आढळणारे विषारी साप कोणते? What are the poisonous snakes found in India?

भारतात अनेक प्रकारचे साप आढळतात.त्यांतील चारच प्रकारचे साप आणि काही समुद्रसाप विषारी असतात. नाग, फुरसे, मण्यार, घोणस हे साप विषारी असतात. बाकीचे सर्व साप बिनविषारी असतात.

1.नाग: [Cobra]

भारतात आढळणाऱ्या सापाच्या प्रमुख विषारी जातीपैकी एक साप म्हणजे नाग होय. नाग हा साप आशिया आणि आफ्रिका खंडात आढळतो. किंग कोब्रा हा भारतात आणि आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात आढळतो. नागाच्या जातींपैकी सर्वात लांब जात म्हणून किंग कोब्रा या नागाची ओळख आहे. भारतातील नाग काळसर, पिवळसर रंगाचे असतात. नागाचा फणा हे नागाचे खास लक्षण आणि वैशिष्ट्य आहे. इतर कोणत्याही सापाला नागासारख्या फणा नसतो. नागाच्या मानेवर असलेल्या बरगड्या स्नायूंच्या आकुंचनामुळे फाकतात. त्यावेळी त्यांची त्वचा ताणली जाते.
यालाच आपण फणा म्हणतो. नागाला भीतीची, संकटाची चाहूल लागली की तो फणा काढतो. प्रणयातूर झालेला नाग फणा काढून नागिनीला आकर्षित करतो. फणा काढल्यावर पोटाच्या पांढऱ्या भागावर काळ्या वक्राकार रेषा दिसतात. या रेषा दहाच्या आकड्या- सारख्या दिसतात. नाग हा आकाराने सरळसोट असतो. त्यामानाने शेपूट बारिक असते. उंदीर, बेडूक हे नागाचे आवडते खाद्य आहे. “नाग” हे भारतातील नागा संस्कृतीचे प्रतीक आहे. भगवान शिव नाग संस्कृतीतीलच घटक आहेत.

2. फुरसे: [Little Indian viper]

फुरसे हा खूप लहान आणि बारिक असलेला विषारी साप आहे. या सापाची लांबी सुमारे 45 ते 55 सेमी असते. काही फुरसे याहीपेक्षा लांब आढळतात. नाग या सापापेक्षाही कितीतरी पटीने अधिक विषारी असलेला हा हा साप भारतात समुद्र किनारपट्टी, कोकण किनार प‌ट्टीवर आढळतो. विशेषतः जांभा खडक असलेल्या ठिकाणी फुरसे अधिक प्रमाणात आढळतो. हा साप चावल्यानंतर 20 में 40 मिनिटांत माणसाचा मृत्यू होऊ शकतो. फुरसे या सापाचा रंग, तपकिरी, किंचित पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. ही साप जांभ्या खड‌कात लपला तर सहसा पटकन दिसत नाही. त्याचे डोके त्रिकोणी असून त्याच्यावर बाणासारखी खूण असते. शरीराच्या मानाने डोके किंचित मोठे दिसते. या सापाचा पोटाचा भाग पांढरा असतो. त्यावर काळसर तपकिरी बारिक ठिपके असतात.

संकटाची चाहूल लागताच फुरसे हा साप अंगाचे वेटोळे करून त्यावर डोके काढून सावध आणि आक्रमक पवित्रा घेऊन बसतो. फुरसे स्वतःहून आक्रमण करत नाही. धोक्याची अधिक शक्यता असल्यास तो शत्रूवर उडी मारुन दंश करतो. फुरसे या सापाला फरोड किंवा फरुड असेही म्हणतात.

3. मण्यार: [krait snake]

मण्यार हा एक बारिक, सड‌पातळ असलेला विषारी साप आहे. मण्यार सापाचे पट्टेरी मण्यार, काळा मण्यार असे प्रकार पडतात. या सापाची लांबी 100 ते 150 सेमी. पर्यंत असते. या सापाचा रंग फिकट निळसर आणि अंगावर पांढरे आडवे पट्टे असतात. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या 15 पटीने जास्त विषारी असते. मण्यार हा साप भारत, अफगाणिस्तान, बांग्लादेश, नेपाळ इत्यादी देशात आढळतो. हा साप विशेषत: रानावनात, जंगली भागात आढळतो, उंदीर, बेडूक सरडे, हे मण्यारचे अन्न आहे. मण्यार सापाचे विष एका वेळी साधारणतः 20 मिली ते 40 मिलिग्रॅम एवढे बाहेर फेकले जाते.

4. घोणस: [Russell Viper Snake]

घोणस हा साप भारतात सर्वत्र आढळतो.शांत आणि हळूवार हालचाल हे घोणस सापाचे वैशिष्ट्य आहे. घोणस सापाच्या पाठीवर साखळीसारख्या तीन समांतर रेषा असतात. या सापाचा रंग करडा, हिरवट, पिवळसर असा संमिश्र रंगाचा असतो. या सापाचे वैशिष्टय म्हणजे तो आपल्या पोटातच अंडी उबवतो आणि पिलांची पूर्ण वाढ झाल्यापर अंडी पिलांसह बाहेर काढतो.

घोणस या सापाचे विष अत्यंत जहाल असते. ते हळूहळू सर्वत्र पसरते. हा साप पायाला चावल्यानंतर पाय सुजतो. तेथे ह‌ळूहळू जखमा होतात. वेळीच उपचार न केल्यास पाय सडत जातो.

कॅन्सर(कर्करोग)सारख्या दुर्दम्य आजारावर उपचार करण्यासाठी सापचे विष प्रक्रिया करून वापरतात. म्हणून कोणताही विषारी अथवा बिनविषारी साप मारू नये.साप ही निसर्गाने दिलेली देणगी आहे.ती जपून वापरा.

सापाच्या विषाचे उपयोग: Uses of snake venom

सापांच्या विषाचे खूप उपयोग आहेत.कर्करोग, कुष्ठरोग बरे करण्यासाठी सापाच्या विषापासून बनवलेले औषध वापरतात. एखाद्या माणसाला विषारी साप चावला असेल तर,त्याच्याच विषापासून बनवलेले प्रतिबंधक औषध इंजेक्शन म्हणून वापरतात.

जैवविविधतेत नागाचे तसेच सर्वच प्रकारच्या सापांचे महत्त्व खूप आहे.म्हणून सापांचा आदर करा.त्यांना मारू नका..

नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Leave a comment